अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केला गव्हाचा पेरा 

याेगेश फरपट - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

अकाेला - ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ आज हा विचार प्रत्येकच युवक करीत असल्याने युवकांचा शेती करण्याकडे आेढा कमी हाेत चालला आहे. स्वतः जिल्ह्याच्या सर्वाेच्च पदावर आरूढ असतांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नाेकरीसाेबत शेती ही संकल्पना रूजविण्याचा प्रयत्न केला असून बुधवारी (ता.१६) त्यांनी गव्हाचा पेरा केला. 

अकाेला - ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ आज हा विचार प्रत्येकच युवक करीत असल्याने युवकांचा शेती करण्याकडे आेढा कमी हाेत चालला आहे. स्वतः जिल्ह्याच्या सर्वाेच्च पदावर आरूढ असतांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नाेकरीसाेबत शेती ही संकल्पना रूजविण्याचा प्रयत्न केला असून बुधवारी (ता.१६) त्यांनी गव्हाचा पेरा केला. 

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी हाेण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मिशन दिलासा सुरू केला आहे. मिशन दिलासाच्या माध्यमातून गावाेगावी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध समस्यांची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षीच्या खरिप हंगामापासून बंगल्यावर शेतीचा प्रयाेग सुरू केला. बसस्थानक राेडवरील मुख्य पाेस्ट आॅफीससमाेर जिल्हाधिकाऱ्यांचा सहा एकर जागेत बंगला आहे. याठिकाणी आधी बाभळीची झाडे वाढलेली हाेती. या अनावश्यक झाडांची कटाई करून त्याठिकाणी पाच एकर जागा शेतीसाठी तयार केली. त्यावर तुर, साेयाबीन, उडीद, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांसाेबत टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, पालक, कोथिंबीर, गवार यासारखी विविध पालेभाज्या पिके घेण्यात येतात.

सध्या रब्बीचा हंगाम सूरू झाला आहे. त्यामुळे खरिपाप्रमाणे रब्बी गव्हाचा पेरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले. त्यानुसार बुधवारी (ता.१६) दुपारी २ वाजता त्यांची सुविज्ञ पत्नी साेनम श्रीकांत यांनी जमिनीची व यंत्राची विधीवत पूजा केली. त्यानंतर सी.एच.२२९ या जुना देशी व्हेरायटीचा गव्हाचा पेरा करण्यात आला. सातारा (नागठाणे) येथील शेतकरी मनाेहर साळुंखे यांनी हा गहू खास पेरणीसाठी पाठवला. यावेळी महाबीजचे अधिकारी एस.ए.शेख, भिमराव पवार, विनाेद मुरूमकार, आत्माराम गाेरले, रामेश्वर मुरूमकार या शेतकऱ्यासह डिगांबर ठक, मिलिंद ताजने, प्रविण सिरसाठ आदी कर्मचारी उपस्थीत हाेते. त्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी मदत केली.

तूर बहरली

यंदाच्या खरिप हंगामात पेरलेली तूर बहरलेली दिसून आली. १५ ते २० दिवसात तूरीची साेंगणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जूलै महिन्यात लावण्यात आलेली विविध प्रजातीची झाडे आज माेठी झाली असून यामुळे परिसर शाेभून दिसत आहे. 

शेतीवर प्रेम करा 

शेतीशिवाय पर्याय नाही. प्रत्येक युवकाने नाेकरीसाठी प्रयत्न जरूर करावेत. पण साेबतच वडीलांना शेतीच्या कामात हातभार लावावा. शेतीचा जिव्हाळा कमी हाेवू देवू नका. तीच्यावर कायम प्रेम करत रहा.

- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी

Web Title: District collectors and sow wheat