सावनेर तालुक्‍यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सावनेर (जि.नागपूर ): रस्त्यांच्या क्षमतेपेक्षा वाहतुकीची वर्दळ असल्याने रस्ता उखडणे व खड्‌डे पडणे नित्याचेच झाल्याने गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणारे हे रस्ते आमदार सुनील केदार यांच्या पुढाकाराने प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजूर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ग्रामीण रस्ते प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी आमदार सुनील केदार यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. त्यानुसार सावनेर तालुक्‍यातून पाच तर कळमेश्वर तालुक्‍यातील नऊ असे विधानसभा क्षेत्रात एकून 14 रस्त्यांना मंजुरी मिळाल्याचे समजते.

सावनेर (जि.नागपूर ): रस्त्यांच्या क्षमतेपेक्षा वाहतुकीची वर्दळ असल्याने रस्ता उखडणे व खड्‌डे पडणे नित्याचेच झाल्याने गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणारे हे रस्ते आमदार सुनील केदार यांच्या पुढाकाराने प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजूर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ग्रामीण रस्ते प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी आमदार सुनील केदार यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. त्यानुसार सावनेर तालुक्‍यातून पाच तर कळमेश्वर तालुक्‍यातील नऊ असे विधानसभा क्षेत्रात एकून 14 रस्त्यांना मंजुरी मिळाल्याचे समजते. प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळाल्याने चंदू बनसिंगे, अमर सुके, अन्नपूर्णा डहाके, अनिल रॉय, सतीश लेकुळवारे, गोविंदा ठाकरे, ईश्वर घोडमारे, शालिकराम घोडमारे, मनोज बसवार, सोनू देशमुख, पप्पू लिखार, चंदू कामदार, आश्विन कारोकार, संजय गोडबोले, सुनिल डाखोळे आदींनी आमदार सुनिल केदार यांचे स्वागत केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Road Status for five roads in Sawner taluka