जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

अकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विभागायी आयुक्तालयात १९ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विभागायी आयुक्तालयात १९ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे.

प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ५ वाजता अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या समस्या प्रश्नी आयुक्तालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. विभागीय आयुक्त डॉ.सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हिणाऱ्या या बैठकीला प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे , अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री , शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर , सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सानप व शिक्षण विभागाशी संबंधित सर्व विभाग प्रमुख उपस्थिय राहणार आहेत. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी प्रथमच अमरावती जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभाग स्तरावर बैठकीचे आयोजन केले आहे.

विभागीय आयुक्तालयात होणाऱ्या या बैठकीप्रसंगी शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रिया टप्पा -३ च्या अनुषंगाने विभागातील सर्व जिल्ह्यांची अद्यवात शिक्षक रिक्त पदे, शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील समस्या, आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता लागू करावा, डी सी पी एस धारक शिक्षकांच्या समस्या, शिक्षकांच्या आयकर कपातीचा हिशोब, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्यध्यापक, पदवीधर शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नत्या, पदवीधर/विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करावी, जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत रँडमने व पती पत्नी विभक्त झालेल्या शिक्षकांना सोयीच्या पदस्थापणा देण्यात याव्या (आपसीचा पर्याय देण्यात यावा), अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हास्तरावरून तात्काळ समायोजन करण्यात यावे, २० पटाच्या शाळा बंद न करण्याबाबत कार्यवाही करावी या व इतर महत्वपूर्ण समस्या वजा मागण्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात करण्यात येणार आहे.

Web Title: divisional commissioner concentrate on zp school employees