यवतमाळातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापनांची कामे रडारवर; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश

divisional commissioner order to investigate the construction work in yavatmal
divisional commissioner order to investigate the construction work in yavatmal

यवतमाळ : नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन, शहरातील व वाढीव क्षेत्रांतील रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीतून करण्यात आलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी केली होती. त्यावर याबाबत नगरविकास विभागाने चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनी तीनसदस्यीय समिती स्थापन केली असून, या समितीला येत्या 22 ऑक्‍टोबरपर्यंत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

यवतमाळ शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. 14व्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून प्राप्त निधीनुसार घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाच ठेकेदाराला कंत्राटी पद्धतीने देण्यात आले. हे काम करताना ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे निकष न पाळता मर्जीनुसार कामे केली जात आहेत. शहरातील कचरा हा अनेक दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नाही. अशी परिस्थिती असतानाही मुख्याधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला देयके अदा करण्यात येते. तीन वर्षांपासून ठेकेदारामार्फत मनुष्यबळ व ट्रॅक्‍टर पुरविण्यात आल्याचे दर्शविले जाते. या ट्रॅक्‍टरवर कोणत्याही प्रकारची नंबर सिरीज समोर दर्शविण्यात आलेली नाही. चुकीचे नंबर देऊन बिले अदा करण्यात आल्याने चौकशीची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे.

शासनाकडून वाढीव क्षेत्रासाठी 14 कोटी व पाच कोटी असे 19 कोटी रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी देण्यात आला. या निधीमधून करण्यात आलेल्या कामाचा दर्जा हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट असल्याने सहा महिन्यांत रस्ते उखडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणी होत आहेत. असे असतानाही ठेकेदाराच्या हिताच्यादृष्टीने कोट्यवधी रुपयांचे बिल देण्यात आले. दोषींवर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. पालकमंत्र्यांनी नगरविकास मंत्र्यांना पत्राद्वारे माहिती दिल्यानंतर शासनाने चौकशी अहवाल मागितला आहे. यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले. यवतमाळ शहरातील या कामांच्या चौकशीसाठी तीनसदस्यीस समिती स्थापन केली असून, विभागीय आयुक्तांनी येत्या 22 ऑक्टोबरपर्यंत अहवाल मागितला आहे. त्यामुळे या चौकशीत बडे मासे गळाला लागून गौडबंगाल बाहेर येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नगरपालिकेत धडकले पत्र -
विभागीय आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम, रस्तेदुरुस्ती, यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्ते आदींच्या चौकशीसाठी तीनसदस्यीय समिती स्थापन केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील ताळमेळ शाखेचे सहाय्यक संचालक विजय देशमुख हे पथम प्रमुख असून, अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे, यवतमाळचे जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड हे दोन सदस्य आहेत. या समितीला 22 ऑक्‍टोबरपर्यंत अहवाल सादर करावयाचा आहे. तर विभागीय आयुक्तांना 30 दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना नगर विकास विभागाने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com