"डीएमओ' कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

अकोला - ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी करा, चुकारे अदा करा, या मागणीसाठी आग्रही असलेल्या शेकडो शिवसैनिकांनी शुक्रवारी (ता.18) दुपारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयात तोडफोड केली. जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांनी याविरोधात खदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शासनाच्या आदेशानुसार नाफेड खरेदीची मुदत संपल्याने 15 मे रोजी शासकीय तूर खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. मात्र, गोदामांची व्यवस्था नसल्याने ऑनलाइन नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर अद्यापही घरातच पडून आहे.
Web Title: DMO Office damage by Shivsainik