गणेश वर्गणीसाठी सक्ती करू नका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

अमरावती : गणेशोत्सवादरम्यान वर्गणीसाठी नागरिकांना सक्ती किंवा जबरदस्ती करू नका, नागरिकांकडून वर्गणी ही स्वेच्छेनेच घेण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी मंगळवारी (ता. सहा) गणेशमंडळांना केली.

अमरावती : गणेशोत्सवादरम्यान वर्गणीसाठी नागरिकांना सक्ती किंवा जबरदस्ती करू नका, नागरिकांकडून वर्गणी ही स्वेच्छेनेच घेण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी मंगळवारी (ता. सहा) गणेशमंडळांना केली.
गाडगेनगर ठाणे हद्दीतील गणेशमंडळ पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, मोहल्ला समिती आदींची बैठक पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवन येथे सकाळी पार पडली. ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह परिसरातील नगरसेवक व अन्य गणमान्य नागरिक बैठकीला उपस्थित होते. गणेश मूर्तीची निवड करताना ती ट्रॅक्‍टरमध्ये ठेवल्यानंतर जमिनीपासून मूर्तीची उंची 14 फुटांपेक्षा अधिक असता कामा नये, गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापना ज्या मंडपात केली जाते, तो मंडप वॉटरप्रुफ करण्यात यावा, रोशनाई करताना शॉर्टसर्किट होणार नाही किंवा ठिणगी उडून पेट घेणार नाही, याची दक्षता घ्यावी, जनरेटर मंडपापासून अंतरावर ठेवावे, पार्किंगची व्यवस्थासुद्धा मंडपापासून दूर ठेवावी, रात्री दर्शनीभाग पूर्णतः झाकला जाईल, याची काळजी घ्यावी, डीजेचा वापर करू नये, ध्वनिक्षेपक वापरताना वेळेचे बंधन पाळावे इत्यादी सूचना यावेळी देण्यात आल्यात.
यासोबतच आयुक्तालयाच्या ग्रामीण भागात ज्या मार्गाने मिरवणूक निघेल, त्या मार्गाची पोलिस, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदींतर्फे पाहणी केली जाईल. रस्त्यांमुळे कुठली बाधा निर्माण होणार नाही, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्‍यक त्या सूचनासुद्धा दिल्या जातील. विद्युत पुरवठ्यात अडथळा येणार नाही, यासाठी महावितरणशी संपर्क साधला जाणार असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not force Ganesh to subscribe