पेरणीची घाई नको, पावसाचा मोठा खंड

कैलास चव्हाण
गुरुवार, 14 जून 2018

परभणी - मराठवाड्यात येत्या ता.28 जून पर्यंत पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याने पेरण्या करण्याची घाई करु नये असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने केले आहे.

यंदा मराठवाड्यात जूनच्या पहिल्या तारखेपासून पावसाची दमदार सुरुवात झाली होती. सलग दहा दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. दहा तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडल्यानंतर तेव्हापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पाऊस गायब झाला असून लख्ख उन पडत आहे. तसेच वारेदेखील जोरात वाहत आहेत. दहा तारखेरोजी झालेल्या पावसानंतर मराठवाड्यात काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. कापुस लागवडीसोबत सोयाबीनची देखील पेरणी  करताना दिसुन येत आहेत. मात्र आता पावसाचा मोठा खंड असल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावु शकते. 15 ते 28 जून पर्यंत पावसाचा खंड राहण्याची शक्यता असल्याची माहीती ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली असून पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Do not hurry to sow, due to delay in monsoon