पराभुतांना उत्तरमध्ये लादू नका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : उत्तर नागपूरमध्ये मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला लादू नका, अशी मागणी उत्तर नागपुरातील कॉंग्रेसचे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांच्याच विरोधात नितीन राऊत यांनी प्रचार केल्याचाही आरोप करण्यात आला.

सर्व नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्त्यांचा विरोध असल्याने कॉंग्रेसबहुल समजल्या जाणाऱ्या उत्तर नागपूर मतदारसंघात राऊत यांना उमेदवारी दिल्यास पुन्हा पराभव होईल, असेही प्रदेशाध्यक्षांना सांगण्यात आले. ते पाच वर्षांपासून मतदार व कार्यकर्त्यांच्याही संपर्कात नाहीत. मंत्री असतानाही पक्षसंघटनेसाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे राऊत यांच्या विरोधात असंतोष आहे. ज्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी कोणालाही उमेदवारी पक्षाने द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not impose