जातिपातीवरून राजकारण करू नये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

नागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले.
पूर्व नागपुरातील नागरिकांना पट्टेवाटप कार्यक्रमाचे आयोजन नंदनवन, राजीवनगर येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, बंटी कुकडे, मनपा आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, नासुप्र सभापती शीतल उगले उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, आम्ही विकासकामात भेदभाव करीत नाही. जात, धर्म, भाषेच्या आधारावर विकासकामे करीत नाही. काम करणे जनतेची सेवा आहे. ते आम्ही प्रामाणिकपणे करतो. काही लोक विकासकामाच्या आधारे समोर जाऊ शकत नाही. त्यामुळे ते जातिपातीचे राजकारण करीत असतात. हा देश एका विशिष्ट जाती, धर्माचा किंवा भाषेचा नाही; सर्वांचाच आहे. आमच्या शाळा, कॉलेज नाहीत, असे सांगून संस्थानिकांवर टीका केली. प्रत्येक नागरिकाला घर देण्याची योजना सरकारची आहे. लोकांना स्वत: मालकीची जागा देण्यात येत आहे. एवढेच नाही, तर घर बांधण्यासाठी पाच लाखांपर्यंतचे अनुदानही देण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. या भागातून गत लोकसभा निवडणुकीत कमी मते मिळाली. यंदा नागरिक भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खोपडे यांनीही कॉंग्रेसच्या नेत्यांवर हल्ला चढविला.
पट्‌टेवाटपामुळे अनेकांच्या दुकानदाऱ्या बंद
जमिनीचा हक्क मिळाल्याशिवाय विकास होत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही लोकांना जागा मालकीची करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. याला वेळ लागला. अखेर आम्ही शब्द पूर्ण केला. याच्या पूर्वीच्या सरकारने घोषणा केल्या; पण पट्टे दिले नाही. गरिबांना जागा देण्यासाठी अनेक नियम लावले. आम्ही ते सर्व बाजूला सारले. आता ही जागा तुमची झाली आहे. पट्टेवाटपामुळे अनेकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. भांडेवाडीत बायोमायनिंग प्रकल्प सुरू झाला आहे. यामुळे भांडेवाडी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीपासून तीन वर्षांत मुक्ती मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Do not politics by caste