Video : तुम्हाला माहिती आहे आयपीएल प्लेअर काय करतोय अकोल्यात?, रणजी आणि अंडर १९ चे खेळाडूंचा जाणून घ्या दिनक्रम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आणि सगळेच काही थांबले. अगदी मैदानी खेळही. दिल्ली ते गल्लीपर्यंत परिचित असलेला खेळ क्रिेकेटचे सामनेही रद्द आहेत. मात्र, हे क्रिकेट प्लेअर सध्या काय करीत असतील असा अनेकांना प्रश्न पडला असेल.

अकोला : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आणि सगळेच काही थांबले. अगदी मैदानी खेळही. दिल्ली ते गल्लीपर्यंत परिचित असलेला खेळ क्रिेकेटचे सामनेही रद्द आहेत. मात्र, हे क्रिकेट प्लेअर सध्या काय करीत असतील असा अनेकांना प्रश्न पडला असेल.

 त्याच आयपीएल किंग्स इलेव्हन पंजाब संघात मागील दोन वर्षापासून निवड झालेला दर्शन नळकांडेही अकोल्यात अडकला असून, तो सध्या टाळेबंदीत स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.
अगदी दोन वर्षापासून आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झालेला गोलंदाज दर्शन नळकांडे लाॅकडाउनच्या काळात अकोल्यात काय करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना.

सोबतच अंडर 19 आणि विविध स्पर्धा गाजविणारे क्रिकेट खेळाडू अकोल्यात थांबले असून, त्यांचा दिनक्रम व्यस्त असल्याची माहिती आहे. सध्या अकोल्यात आयपीएलसह रणजी आणि अंडर 19 संघात आपली कामगिरी दाखविणारे सात खेळाडू असून, सर्व जण पुढील भविष्यात होणाऱ्या सामन्यांसाठी स्वतःला तयार करीत आहेत.

Akola's vision will shine in the IPL | Yin Buzz

असा असतो या क्रिकेट प्लेअरचा दिनक्रम
दर्शन नळकांडेसह अथर्व तायडे, आदित्या ठाकरे यांच्यासह अन्य चार जण सकाळी आॅनलाईन फिटनेस क्लास, स्ट्रेन्थ क्लास, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे,योगा करणे सांगितलेला डाएट घेणे आदी उपक्रम करून सहा दिवस हा उपक्रम करून सातवा दिवस सुटीत घालवतात. सध्या हे खेळाडू विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे दिलेल्या आॅनलाईन फिटनेस प्रमाणे घरातूनच फिटनेस प्रोग्राम करीत आहेत.

भारताच्या दिवसभरात चारशे धावा | eSakal

हे आहेत अकोल्याचे सेव्हन स्टार
दर्शन नळकांडे हा आयपीएल प्लेअर असून, त्याने आतापर्यंत अंडर १९, रणजी ट्राॅफी सोबतीच मुश्ताक अली ट्राॅफी गाजविली आहे. सोबतच अथर्व तायडे हा अंडर १९, २३, रणजी ट्राॅफी,

 

अकोल्याचा आदित्य ठाकरे भारतीय युवा ...

आदित्य ठाकरे याने भारताच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला होता तर रणजी आणि इराणी ट्राॅफी गाजविली आहे. याचबरोबर पवन परनाते याने विदर्भ अंडर २३, रणजी ट्राॅफीन खेळला आहे. नयन चव्हाण याने भारताच्या अंडर १९, विदर्भाच्या अंडर १४, १६, १९ आणि २३ मध्ये सहभाग घेतलेला आहे.

अंकुश वाकोडे याने आतापर्यंत भारताच्या अंडर १९, विदर्भाच्या अंडर १६, १९ आणि २३ मध्ये सहभाग घेतला आहे. तर मोहित राऊत विदर्भाच्या अंडर २३ मध्ये खेळला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know what IPL players are doing in Akola?, Get to know Ranji and Under-19 players