खबरदार! डेंगी रुग्णांची माहिती लपवाल तर!

file photo
file photo

नागपूर : शहरातील मनपा रुग्णालये, शासकीय रुग्णालयांमधील डेंगी रुग्णांची माहिती महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला देणे बंधनकारक आहे. मात्र, काही खासगी रुग्णालय, दवाखान्यांकडून ही माहिती लपविली जात असल्याने आयुक्त अभिजित बांगर यांनी संताप व्यक्त केला. डेंगीच्या रुग्णांबाबत माहिती न देणाऱ्या डॉक्‍टरांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी शनिवारी आरोग्य विभागाला दिले. 
डेंगीच्या नियंत्रणासाठी शहरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी महापालिकेत आढावा घेतला. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे आदी उपस्थित होते. 
डेंगीवर उपाययोजना करण्यासाठी रुग्णांची योग्य आकडेवारी आवश्‍यक आहे. परंतु, खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील डेंगीची माहिती मिळत नाही. यावर बैठकीत चर्चा झाली. शहरातील डेंगीच्या रुग्णांची माहिती मिळविणे तसेच रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविणे आवश्‍यक आहे. यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील डॉक्‍टरांना आवाहन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. डॉक्‍टरांना सोशल मीडिया व वर्तमानपत्राच्या माध्यमातून वेळोवेळी रुग्णांच्या दैनंदिन केसची माहिती, नमूने देण्याचे आवाहन करावे. खासगी डॉक्‍टरांसह सामान्य नागरिकांनाही डेंगीबाबत माहिती देण्यासाठी मनपाच्या झोनस्तरावरील चमूने विविध वस्त्या, सदनीकांमध्ये भेट द्यावी. तेथे डेंगी पसरण्याची कारणे, लक्षणे व घ्यावयाची काळजी आदी बाबत जनजागृती करावी. सदनिका, वस्त्यांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी डेंगीबाबत जनजागृती करणारे फलक, पोस्टर्स लावण्याचेही निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. 
डेंगीबाबत व्हॉट्‌सऍप, ई-मेलवर करा तक्रार 
खासगी रुग्णालये, दवाखाने तसेच नागरिकांच्या डेंगीसंदर्भात तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदविता येणार आहेत. डेंगीबाबत तक्रार अथवा माहिती हवी असल्यास मनपाच्या 9607942809 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा vbdcomplaints.nmc@gmail.com या ई-मेलवर अथवा https://m.facebook.com/nmcngp/ या फेसबुक पेजवर आणि https://twitter.com/ngpnmc या ट्विटर पेजवर नोंदवावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com