डॉक्‍टरांनी संघटित व्हावे : डॉ. शांतनू सेन

नागपूर : मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना डॉ. व्ही. एन. वांकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. शांतनू सेन; सोबत डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. मंजूषा गिरी व इतर.
नागपूर : मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना डॉ. व्ही. एन. वांकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. शांतनू सेन; सोबत डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. मंजूषा गिरी व इतर.

नागपूर ः डॉक्‍टरांवर होणारे हल्ले ही राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे. अनेक छोट्या देशांमध्ये हा विषय हाताळण्यात तेथील यंत्रणा सक्षम आहे. मात्र, भारतामध्ये हे हल्ले रोखण्यात सरकारी यंत्रणा सक्षम नसल्याची खंत व्यक्त करीत डॉक्‍टरांनी संघटित व्हावे, असे आवाहन आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच खासदार शांतनू सेन यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित "महाएएमएसकॉन आणि निमॅकॉन-2019' या परिषदेचे उद्‌घाटन करताना डॉ. सेन बोलत होते. आयएमएच्या सभागृहातील सोहळ्यात महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. होजी कपाडिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पचनेकर, महाराष्ट्र आयएमएचे सचिव डॉ. सुहास पिंगळे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, सचिव डॉ. राजीव अग्रवाल, महाराष्ट्र आयएमएचे पुढील वर्षाचे अध्यक्ष अविनाश भोंडवे, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. रमेशकुमार दत्ता, डॉ. संजिब बंडोपाध्याय उपस्थित होते. डॉक्‍टर सोडून अन्य कुठल्याही व्यवसायात हल्ले होत नाही. न्याय मिळाला नाही म्हणून वकिलांवर हल्ला होत नाही. मात्र, डॉक्‍टरांवर हल्ले होतात. डॉक्‍टर संघटित नसल्याचे हे यापुढे अधिकच बिकट होतील, असे भाकीत डॉ. सेन यांनी केले. प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना मानाचा डॉ. व्ही. एन. वांकर पुरस्कार डॉ. शांतनू सेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पंचेचाळीस वर्षे आयएमएच्या नागपूर कार्यालयात सेवा देणारे दत्तात्रय ऊर्फ राजीव प्रभाकर दलाल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. कुश झुनझुनवाला यांनी केले. परिषदेची भूमिका लैंगिक रोग तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांनी विशद केली. संचालन डॉ. अंजू कडू आणि डॉ. वर्षा झुनझुनवाला यांनी केले. डॉ. मंजूषा गिरी यांनी आभार मानले.
डॉ. व्ही. एन. वांकर माझे शिक्षक होते. समाजसेवेची प्रेरणा त्यांनी दिली. पुरस्कार स्वीकारताना मागे वळून बघितले तर अनेक संस्था आणि लोकांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव आहे. डॉ. वांकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने सामाजिक जबाबदारी वाढली आहे. - डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com