श्‍वानांच्या समस्येवरून गडकरी भेटले गडकरींना

Nitin-gadkari
Nitin-gadkari

नागपूर - शहरात मोकाट श्‍वानांचा हैदोस वाढला असून, दररोज चार ते पाच जणांचा बळी जात आहे. याप्रकरणी कारवाईसाठी मनपाकडून निराशा झाली असून, आता आपणच तोडगा  काढा, असे साकडे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांना घातले. 

‘सकाळ’ने शनिवार, ५ जानेवारीला नंदनवन येथील शालेय विद्यार्थ्यावर १२-१५ मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष अजय ढोके, विशाल बडगे यांनी केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मनपाच्या कारभारवर नाराजी व्यक्‍त केली. कुत्र्यांच्या हैदोसामुळे नागपूरकरांत दहशत निर्माण झाली. याबाबत महापालिकेला अनेक निवेदन दिली, परंतु मनपा प्रशासनाकडून केवळ आश्‍वासन दिले जाते.

याप्रकरणी आपणच पुढाकार घेऊन महापालिकेला ठोस उपाययोजनांबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री  गडकरी यांच्याकडे केली. यावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मनपाला निर्देश देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, मध्य विभाग उपाध्यक्ष सुमित वानखेडे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्यासह सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com