33 हजारांवर नागरिकांना कुत्र्यांचा चावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या अडीच वर्षांत 33 हजारांवर नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत आहे. रुग्णांना महापालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. ही महापालिकेची आकडेवारी असून, खासगी, मेडिकल आदी ठिकाणीही हजारो नागरिक उपचार घेत असल्याने कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांची संख्या 33 हजारांपेक्षाही अधिक असल्याचे सूत्राने नमूद केले. मोकाट कुत्र्यांना नियंत्रणात आणण्यात महापालिका अपयशी ठरल्याने रेबीजसारख्या आजारावर नियंत्रणासाठी रेबीज रोगप्रतिबंधक लस एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

कुत्र्यांमुळे रेबीजसारखा जीवघेणा आजार होत असल्याचे सर्वश्रुत आहे. रॅबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 50 टक्के मृत्यू 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे असतात, असे जागतिक आरोग्य संस्थेनेच नमूद केले आहे. मात्र, अद्याप मोकाट कुत्र्यांबाबत महापालिका गंभीर नसल्याचेच चित्र आहे. सध्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत. परिणामी गेल्या सहा महिन्यांत 2195 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. गेल्या अडीच वर्षांत 33 हजार 303 नागरिक श्‍वानांच्या चावल्याने जखमी झाले. यातील सर्वच नागरिकांनी महापालिकेच्या विविध रुग्णालयांत तत्काळ रेबीज रोगप्रतिबंधक उपचार घेतले. रेबीजमुळे मृत्यूच्या संख्येची नोंदणी महापालिकेत नाही. महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी हॉस्पिटल, पाचपावली सूतिकागृह, सदर दवाखाना, महाल, आयसोलेशन, चकोले दवाखाना, सतरंजीपुरा येथील रुग्णालयांत तत्काळ उपचार होत असल्याने अनेकांचे प्राण वाचले.

कुत्रा चावल्याने होणाऱ्या रेबीजमुळे रुग्णाला पाणीही गिळता येत नाही. त्यामुळे या रोगाला हायोड्रोफोबियाही म्हणतात. रोगाची लागण झाल्यानंतर उपयुक्त प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध नाही. त्यामुळे रेबीज रोगप्रतिबंधक लस लावणे, हा एकमात्र उपाय आहे. कुत्रा चावण्यापूर्वी रेबीज लस लावल्यास या रोगावर शंभर टक्के नियंत्रण शक्‍य आहे.
-डॉ. मयूर काटे, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा.

श्‍वानदंश झालेल्या नारिकांची वर्षनिहाय संख्या
वर्ष संख्या
2017-18 9861
2018-19 11,633
2019-20 2195 (जूनपर्यंत)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dogs bite more than 33,000 citizens