'आता घाबरू नका,' व्हिडिओचे "सत्य'

file photo
file photo

यवतमाळ : "यवतमाळात पोलिस आपल्या सेवेत, आता घाबरू नका', पोलिस कंट्रोलरूमच्या फोनसह दोन मोबाइल क्रमांक असलेले एक बॅनर समाजमाध्यमावर मंगळवारी (ता. 11) व्हायरल झाले. पोलिस महिलांना रात्रीच्या वेळी घरी पोहोचवून देणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, असा कोणताही उपक्रम पोलिसांकडून राबविला जात नाही. मग, या व्हायरल व्हिडिओमागील सत्य मात्र वेगळेच आहे. 

समाजमन सुन्न झाले

रात्रीदरम्यान कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्‍यात आली, ही बाब पुन्हा एकदा हैदराबाद येथील घटनेने अधोरेखित झाली आहे. नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात अप-डाउन करणाऱ्या महिलांना रात्रीच्या वेळेस घरी पोचायला उशीर होतो. त्यांना ऑटो मिळत नाही. रात्रीदरम्यान वाईट घटना घडण्याची भीती असते. अंधाराचा फायदा घेत आंबटशौकीन आपला रंग दाखवितात. अशा घटना महानगरासह यवतमाळात शहरातही घडल्या आहेत. काहींची चर्चा झाली; तर काही अंधारात गडप झाल्या. हैदराबाद येथील डॉक्‍टर तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेने समाजमन सुन्न झाले.

पोलिस यंत्रणा सज्ज

महानगरातील पोलिसांनी महिलांची सुरक्षा लक्षात घेता, रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत सुखरूप घरी सोडण्यासाठी पुढाकार घेतला. 'यवतमाळ शहरात असाच उपक्रम राबविण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज...यवतमाळ पोलिस आपल्या सेवेत...आता घाबरू नका...'अशा मचकुरासह पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूमचा भ्रमणध्वनीसह दोन मोबाइल क्रमांक टाकण्यात आले. या संदर्भात दामिनी पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक विजया पंधरे यांना विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला अनभिज्ञता दर्शविली. काही वेळात पडताळणी केली. दोन्ही मोबाइल क्रमांककडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट केले. "आता घाबरू नका', हे व्हायरल करणारा कोण, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. जेणेकरून कुणाचीही समाजमाध्यमावर फसवणूक होणार नाही. याचा छडा पोलिसांनी लावणे गरजेचे आहे. कारण या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यावर एखाद्या महिलेची दिशाभूल तर होणार नाही ना, याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील पोलिसांची आहे.

पोलिस घरी पोहोचवून देतील
आता घाबरू नका', दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास पोलिस आपल्याला घरी पोहोचवून देतील, असा कोणताही निर्णय पोलिस दलातर्फे घेण्यात आला नाही. 
-एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, यवतमाळ.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com