पैसे उसणे देऊ नका, दिले तर मागू नका, अन्यथा... 

file photo
file photo

नागपूर : एकाने दुसऱ्याला पैसे उसणे  दिले. मात्र, परत करण्याच नाव घेत नव्हता. पैशासाठी सतत तगादा लावण्याने तो चिडला आणि मित्रांचा मदतीने खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये घडली. या हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज नारायण कोंडलकर (वय 33, रा. श्रीरामनगर, हुडकेश्‍वर) हा नितीन लाकडे यांच्या घरी किरायाने राहत होता. सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्याच्या खोलीतून चार ते पाच युवकांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे नितीन लाकडे आणि भाडेकरू मनोज बोबडे हे दोघेही पंकजच्या खोलीकडे पळत गेले. 

यावेळी चार ते पाच युवक त्याच्या घरातून पळून जाताना दिसले. त्यांच्या हातात तलवार आणि चाकूसारखे धारदार शस्त्रे होती. मनोजने घरात जाऊन बघितले असता पंकज कोंडलकर हा गंभीर जखमी अवस्थेत रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मनोज आणि घरमालक नितीन यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली आणि हुडकेश्‍वरचे ठाणेदार भोसले यांना माहिती दिली. 

हुडकेश्‍वर ठाण्यातील ताफा लगेच घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी जखमी पंकजला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पंकजचा जीव गेला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी घरमालक नितीन यांच्या तक्रारीवरून चार ते पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

उधारीच्या पैशाचा वाद 
पंकज आणि आरोपींचा पैशाच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यामुळे पैसे मागण्यासाठी आरोपी पंकजच्या घरी आले होते. पैशासाठी वाद घातल्यानंतर आरोपींनी पंकजचा खात्मा केला. घरमालक आणि भाडेकरूंना मदतीसाठी धावत येताना पाहताच आरोपींनी पळ काढला. 

पाच आरोपी ताब्यात 
हुडकेश्‍वर पोलिसांनी लगेच पथक स्थापन करून रात्रभर आरोपींचा शोध घेतला. पहाटेच्या सुमारास मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. सकाळी दहा वाजता अन्य चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com