esakal | चक्क खासदार रस्त्यावरील दुकानात डोसा बनवतात तेव्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

चक्क खासदार रस्त्यावरील दुकानात डोसा बनवतात तेव्हा...

चक्क खासदार रस्त्यावरील दुकानात डोसा बनवतात तेव्हा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकांचे दुकान बंद पडले. लॉकडाऊनमुळे रोजगारावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, पोट भरण्यासाठी दुकान लावल्याशिवाय पर्याय नाही. काही तासांसाठीच का होईना दुकान उघडून दोन पैसे कमविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र, हीच वेळ कोण्या खासदारावर आली तर काय म्हणाल? हा प्रकार आज अमरावतीकरांना पाहायला मिळाला. (Dosa-made-on-the-road-shop-by-MP-Navneet-Rana)

वेगवेगळ्या कारणांमुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या नेहमी चर्चेत राहतात. त्या नेहमीच लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. लोकांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असतो. कधी आदिवासी महिलांसोबत डान्स तर कधी क्रिकेटचा सामना, तर कधी मंत्र्यांना पत्राद्वारे विकास करण्याचा त्यांचा आग्रह असतो. यामुळे त्या कायम चर्चेत असतात.

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

त्यांचे असेच एक रूप गुरुवारी अमरावतीकरांना बघायला मिळाले. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यालगत असलेल्या चहा टपरीवर थांबून चहा पिला. यानंतर त्यांनी चक्क डोसाच्या गाडीवर दोसासुद्धा बनविला. यामुळे त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

अमरावती शहरात सध्या अनेक भागात विकासांची कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी त्यांनी पाहणी दौरा केला. यावेळी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कोरोनामुळे व्यापाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि काय नुकसान सोसावे लागले याची माहितीसुद्धा नवनीत राणा यांनी घेतली. नवनीत राणा यांनी छोट्या दुकानदारांची आस्थेने केलेली चौकशी पाहून व्यापारी भारावून गेले.

हेही वाचा: कोण रूपाली चाकणकर? मी फक्त शरद पवार व अजित पवारांना ओळखते

दुकानदारांनी दिला पैसे घेण्यास नकार

लॉकडाऊनमध्ये मोठ्या उद्योगांसोबत लहान दुकानदारांनाही फटका बसला. अनेकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे मिळेल ते काम करून कुटुंब चालवत आहे. मात्र, अजूनही संसाराचा गाडा काही रुळावर आलेला नाही. नवनीत राणांनी अशा व्यावसायिकांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना दिलासा दिला. दुकानातून भाजी घेतल्यावर दुकानदार त्यांच्याकडून पैसे घेत नव्हते. पण त्यांनी जबरदस्तीने घेतलेल्या वस्तूंचे पैसे दिले.

(Dosa-made-on-the-road-shop-by-MP-Navneet-Rana)

loading image