Double conviction for ten accused in Yavatmal
Double conviction for ten accused in Yavatmal

महिलेने केला फोन आणि गेला जीव; न्यायालयाच्या निर्णयानंतर नातेवाईकांनी फोडला टाहो

यवतमाळ : पत्नी सरपंच असल्यामुळे पतीचे अनेकांशी वाद झाले. या वादातून अनेकदा घरावर हल्लाही झाला. मात्र, वाद काही केल्या संपत नव्हता. वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी तुळशीराम हरिदास गावंडे (वय 41, रा. पारवा) यांना एका महिलेद्वारे फोन करून बोलावले. पारवा येथे गावंडे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांचा खून केला. पारवा येथील बहुचर्चित खून प्रकरणातील दहा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सोमवारी (ता. 20) दुपारी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहिउद्दीन एम. ए. यांनी हा निकाल दिला. शिक्षा ऐकताच आरोपींच्या नातेवाइकांनी टाहो फोडला. यावेळी न्यायालयाच्या परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

राज गोपाल ठाकूर (वय 29), मुन्ना गोपाल ठाकूर (वय 27), विनोद प्रकाश चपरीया (वय 36), सुनील मलकू देवतळे (वय 27), हनुमान पांडुरंग पेंदोर (वय 25), शुभम सुरेश टेकाम (वय 22), सुमित ऊर्फ पंड्या ऊर्फ सुमेध नामदेव मेश्राम (वय 20), प्रवीण तुकाराम भगत (वय 42), भीमराव मारोती अवथरे (वय 56), स्वप्नील रघुनाथ कुंभेकर ऊर्फ सुमित पाली (वय 19, सर्व रा. पारवा) अशी दुहेरी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पारवा येथे 27 मार्च 2018 रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नवीन अंगणवाडीजवळ तुळशीराम हरिदास गावंडे (वय 41, रा. पारवा) यांचा राजकीय वैमनस्यातून निर्दयीपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी मृताची पत्नी नलिनी गावंडे (वय 34) यांनी यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून एकूण 16 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

महेश गावंडे यांची पत्नी नलिनी या पारवा येथील सरपंच होत्या. त्यामुळे आरोपी कोणत्या ना कोणत्या कारणातून गावंडे परिवारासोबत वाद घालत होते. गेल्या 28 जानेवारीला त्यांच्या घरावर हल्ला चढविल्यामुळे गावंडे यांनी गाव सोडून यवतमाळात राहणे सुरू केले होते. महेश गावंडे यांचा खात्मा करण्यासाठी ठाकूर बंधू व चपरिया यांनी कट रचला.

खुनासाठी घेतला महिलेचा आधार

27 मार्च रोजी एका महिलेच्या माध्यमातून फोन करून गावंडे यांना पारवा येथे बोलावून घेतले. गावात पोहोचताच दबा धरून बसलेल्या मारेकर्‍यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून गावंडे यांचा निर्घृण खून केला. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. यवतमाळचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविस्ट केले. या खटल्यात एकूण 119 साक्षीदार होते. त्यापैकी 19 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात चार साक्षीदार प्रत्यक्षदर्शी होते. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहिउद्दीन एम. ए. यांनी आज सोमवारी या खटल्याचा निकाल दिला.

पुराव्याअभावी तिघांची सुटका

दहा आरोपींना दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली तर तिघांची पुरावा व संशयाच्या फायदा देत निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अरुण ए. मोहोड यांनी काम पाहिले. निकालानंतर उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त न्यायालय परिसरात ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com