लग्नापूर्वी हुंडा, नंतर घातला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - लग्नापूर्वीच संपत्ती स्वत:च्या नावावर करण्याची अट घालणारी पत्नी इच्छा पूर्ण होताच लग्नानंतर 15 दिवसांत फरार झाली. तसेच स्वत:ला वाचविण्यासाठी पतीने पहिल्या पत्नीपासून विभक्त न होताच तिच्यासोबत लग्न केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी चहूबाजूने अडकलेल्या पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका केली. उच्च न्यायलयाने पीडित पतीचे म्हणणे ऐकून घेत पत्नीला नोटीस बजावली. यानुसार पत्नीला तीन आठवड्यांत उत्तर सादर करायचे आहे. 

प्रतिभा पुरुषोत्तम वानखडे असे पत्नीचे नाव आहे. ती अकोला पोलिस मुख्यालयी कार्यरत असताना संदीप महादेव राजगुरे (रा. पोघात, मंगरूळपीर) याच्याशी 27 एप्रिल 2012 रोजी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसातच दोघेही विभक्त राहू लागले. दरम्यानच्या काळात प्रतिभाने मामाच्या मध्यस्थीने शाळेत चपराशी असलेल्या पुरुषोत्तम वानखडे याच्यासोबत लग्न केले. पुरुषोत्तम याचा हा दुसरा विवाह असून त्यानेदेखील पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. सारे काही सुरळीत सुरू असतानाच लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी 4 जानेवारी 2016 रोजी पत्नीने मी तुझ्यापेक्षा वरच्या पदावर असल्याचे कारण सांगत संपत्ती तिच्या नावाने करण्याची अट घातली. पतीनेदेखील त्याच दिवशी तिच्या नावाने सेलडीड तयार केले. यानंतर लग्न झाले आणि 15 दिवसांच्या आत पत्नी सर्व सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन फरार झाली. 

यानंतर पत्नीने स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी पतीवर द्विपत्नीचा आरोप लावला. तशी तक्रार तिने अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी पुरुषोत्तम, त्याचे आईवडील, भाऊ, वहिनी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने पत्नीला नोटीस बजावत तीन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.

Web Title: Dowry before marriage, then put discipleship