सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी डॉ.अभय पाटील

shiv jayanti
shiv jayanti

अकोला : महानगरात अनेक वर्षांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक पद्धतीने जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी आर्थोपेडिक सर्जन डॉ.अभय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


पुढील महिन्यात १९ तारखेला होणाऱ्या शिवाजी महाराज जयंती संदर्भात सार्वजनिक शिवजयंती समितीची सभा छत्रपती शिवाजी पार्क परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सभेत ज्येष्ठ समाजसेवी दिनूभाऊ सुरसे, सुभाष सातव, राम मुळे, पंकज जायले, पवन महल्ले आदी उपस्थित होते. या सभेत जयंती साजरी करण्यासाठी समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनात गठीत समितीचे कार्याध्यक्ष म्हणून पवन महल्ले यांची निवड करण्यात आली. समितीचे सचिव म्हणून चंद्रकांत झटाले, मिरवणूक अध्यक्ष म्हणून पंकज जायले यांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ.पाटील यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांच्या निवडीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात.


छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातीचे आराध्य आहेत. त्यांची जयंती सर्व जाती जमातींना सोबत घेऊन होणे गरजेचे असून, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करून सर्व समाजाला सामूहिकपणे सोबत घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून भव्य दिव्य ही शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली.


समितीचे सचिव चंद्रकांत झटाले यांनी यावेळी शिवजयंतीच्या विविध उपक्रमांची माहिती देत लवकरच जयंतीच्या विविध उपसमित्या गठित होणार असल्याचे सांगितले. मिरवणूक समिती अध्यक्ष पंकज जायले यांनी यावर्षीही अनेक रोख पारितोषिकांची स्पर्धा घेण्यात येणार असून, या स्पर्धेत सर्व विद्यार्थी, महाविद्यालये व नागरिकांना सहभागी करण्यात येणार असल्याचे सांगितले. संचालन चंद्रकांत झटले यांनी केले तर आभार पवन महल्ले यांनी मानलेत. यावेळी प्रशांत भारसाकल, आनंद पाटील सुकळीकर, राहुल लोहिया, विपुल माने, गोपीअण्णा चाकर, पवन बुंदेले, संदीप बाथो, मनीष पटेल, कैलास पवार, रोहित इचे, अभिजित मोरे, संदीप निर्मल, पवन गायकवाड, योगेश कसाब, नरेश वाघ, प्रतीक खराडे, मंगेश नवल, अमोल गाडे, योगेश चव्हाण, योगेश पाटील, सागर तिवारी, वाघमारे, जगताप, बडगुजर, पाचपोर, पाटोळे, नितीन सपकाळ समवेत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com