डॉ. आंबेडकर अकादमीला विजेतेपद

नागपूर : प्रमुख पाहुण्यांकडून ट्रॉफी स्वीकारताना विजेत्या आंबेडकर अकादमीचे खेळाडू.
नागपूर : प्रमुख पाहुण्यांकडून ट्रॉफी स्वीकारताना विजेत्या आंबेडकर अकादमीचे खेळाडू.

नागपूर : तेजस कुंभारेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर डॉ. आंबेडकर क्रिकेट अकादमीने अंतिम सामन्यात नागपूर क्रिकेट अकादमीचा आठ गड्यांनी पराभूत करून रेशीमबाग क्रिकेट क्‍लबतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या आंतरशिबिर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. डीडीनगर शाळेच्या मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या नागपूर अकादमीने 20 षटकांत 6 बाद 90 धावा केल्या. साहिल पनकेने 20 व ओम तिवारीने 14 धावांचे योगदान दिले. आंबेडकर अकादमीकडून पार्थ पाटीलने सर्वाधिक दोन गडी बाद केले. आंबेडकर अकादमीने विजयी लक्ष्य 13.2 षटकांत केवळ दोन गडी गमावून गाठले. सामनावीर तेजसने नाबाद 57 धावा फटकावल्या. विराज अग्निहोत्रीने 17 धावांचे योगदान दिले. प्रमुख पाहुणे डॉ. अग्रवाल व डॉ. दिलीप क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी क्‍लबचे संचालक राजू कावरे व डॉ. संजय देवतळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com