
‘तणावमुक्त परीक्षा व पालकांसाठी आहार’ विषयावर सुप्रसिद्ध आहार व डायबिटीज तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित शनिवारी (ता. 8) गांधी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात मार्गदर्शन केले.
अकोला : माणसाचे शरीर व पेशी या उपाशी राहण्यासाठी आहेत. उपाशी राहिल्याने माणसाचे काहीच नुकसान होणार नाही. परंतु सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत लोक चरण्यावर भर देत आहेत. त्यामुळे त्यांना डायबिटीज सारखा आराज होते. साखरेपासून बनलेले पदार्थ सुद्धा लोकं आवडीने खातात परंतु जो व्यक्ती वारंवार खाणार त्याला देव डायबिटीज देणार, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध डायबिटीज तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शनिवारी (ता. 8) केले.
‘तणावमुक्त परीक्षा व पालकांसाठी आहार’ विषयावर सुप्रसिद्ध आहार व डायबिटीज तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित शनिवारी (ता. 8) गांधी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम ‘सकाळ’ आणि श्री समर्थ एज्युकेशनतर्फे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांना मधुमेह आजाराविषयी मार्गदर्शन करताना डॉ. दीक्षित म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना बऱ्याच लोकांना करावा लागत आहे.
महत्त्वाची बातमी - अकोल्याच्या अनेक फ्लॅट स्किममध्ये डाॅन आंबेकरचा पैसा
अशातच हल्लीच्या काळात लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह असून अनेक कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो. अनेक लोकं मधुमेहाच्या बॉर्डर लाइनवर आढळून येत आहेत. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण सोप्या भाषेत म्हणजे मधुमेहाची (डायबिटीजची) बॉर्डर लाइन म्हणजे त्या व्यक्तीला मधुमेह झालेला नसतो पण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे योग्य व सकस आहार घेतल्यास मधुमेहापासून मुक्त होता येते, असे प्रतिपादन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. कार्यक्रमात शहरातील गणमान्य व्यक्ती, महिला, पुरूष, श्री समर्थ एज्युकेशनचे शिक्षक-शिक्षिका व इतर कर्मचारीवृंदासह इतर नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - नवीन वर्षातील पहिला सुपरमून आज दिसणार, वाचा काय राहणार विशेष
साखरेची पातळी महत्त्वाची
सामान्य व्यक्तींच्या रक्तामध्ये साखरेची पातळी जर जेवणापूर्वी मोजली तर ती साधारण 100 मिलीग्रामपर्यंत असते आणि जेवल्यानंतर साधारण 135 मिलीग्राम असते. पण जर हेच प्रमाण अनुक्रमे 140 आणि 200 मिलीग्रामपर्यंत पोहोचले तर ही मधुमेहाची बॉर्डर लाइन आहे असे समजावे. तसं पाहायला गेलं तर यामध्ये औषधं खाण्याची गरज नसून योग्य आहार व व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवून मधुमेह होण्यापासून बचाव करता येते. परंतु जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्ही मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकता म्हणूनच वेळीच सावध होऊन पावलं उचलणे केव्हाही चांगले, असल्याचे प्रतिपादन डॉ. दीक्षित यांनी केले.
मधुमेह होण्याच्या कारणावर टाकला प्रकाश
० रोजची जीवनशैली ठिक नसणं.
० रोज वेळेवर न झोपणं आणि उठणं.
० सतत तणावाखाली वावरत राहणे.
० चुकीच्या पद्धतीने आहार घेणं आणि व्यायाम न करणं.
मधुमेहांच्या प्रकारांची दिली माहिती
कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांनी मधुमेहाचे दोन प्रकार असल्याचे सांगितले. त्यामध्ये पहिला प्रकार टाइप वन आणि दुसरा टाइप टू मधुमेह असल्याचे त्यांनी सांगितले. टाइप वन मधुमेहाच्या प्रकारात इन्सुलिनचं सेवन करावं लागतं. टाइप टू मधुमेह प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु हल्लीच्या काळामध्ये मधुमेह झालेल्या रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मधूमेहात या समस्यांचा करावा लागतो सामना
असा आहे डायट प्लॅन
डॉ. दीक्षित यांनी कार्यक्रमात मधुमेहग्रस्तांना डाएट प्लॅन सांगितला. त्यांच्यानुसार खाण्याच्या प्रमाणावर आणि खायच्या पदार्थांवर कुठलेही बंधन नाही. परंतु खाण्याच्या वारंवारतेवर मात्र बंधन आहे आणि ते दिवसातून फक्त दोनवेळा खाण्यास सांगतात. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा प्रतिबंध आणि काही प्रमाणात उपचार तसेच लठ्ठपणा आणि मधुमेह काही लोकांमध्ये या डाएट प्लॅन ने परतवून लावल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
कार्बो इन्सुलिन कनेक्शन
सतत थोडे-थोडे खाण्यामुळे शरीरात सतत इन्सुलिन निर्माण होत राहाते. हे वाढलेले इन्सुलिन ग्लुकॅगॉन ला येऊ देत नाही. ग्लुकॅगॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. त्यामुळे सतत थोडे-थोडे खाण्यामुळे ग्लुकॅगॉनला काम न करता आल्यामुळे चरबीचे रूपांतर ऊर्जेत होत नाही आणि शरीरात चरबी तशीच साठून राहते. ही वाढलेली चरबी लठ्ठपणा निर्माण करते. हा लठ्ठपणा काही व्यक्तींमध्ये मधुमेह निर्माण करतो. लठ्ठपणा इन्सुलिन रेझिस्टन्स (प्रतिरोध) निर्माण करतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्सच्या अवस्थेस टाईप टू डायबेटीस किंवा मधुमेह असे म्हणतात.
55 मिनीटात संपवा जेवण
एक जेवण 55 मिनिटात पूर्ण करावे असा मूलमंत्र डॉ. दीक्षित यांनी कार्यक्रमात दिला. 55 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जेवण केल्यास शरीरात अधिक इन्सुलिन तयार होते. थोडे-थोडे अन्न खाल्ले तरीदेखील पुन्हा इन्सुलिन तयार होते आणि कमी किंवा अधिक खाल्ल्यास तेवढेच इन्सुलिन निर्माण होते असे डॉ. दीक्षित यांगी सांगितले. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कमी प्रमाणात अन्न खाण्यापेक्षा अन्न खाण्याची वारंवारता कमी करावी (दोन वेळा) असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
मधुमेहापासून बचावासाठी दिला गुरूमंत्र
अकोलेकरांच्या प्रश्नांची दिली उत्तरे
कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांनी अकोलेकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये हायपर थायरॉइडची समस्या. डायबिटीज प्रमाणे हाडांच्या आजारात आहाराचा संबंध आहे का? दोन वेळ जेवण कसं कराव? डायबिटीज अनुवांशिक आहे का? गर्भवती मातेपासून तिच्या मुलांना डायबिटीज होऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे डॉ. दीक्षित यांनी कार्यक्रमात दिली.