डॉ. मिलिंद वाटवे म्हणतात, विज्ञानाचे लिखाण करणारे लेखक व्हावे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नागपूर : विज्ञानाचे लिखाण करणाऱ्या लेखकांची मराठीत कमतरता आहे. जे आहेत ते सोपी भाषेत लिहीत नाहीत. अनेकांना तर शब्दरचनेत शब्दांचा उपयोग कुठे व कसा करावा याचेच ज्ञान नाही. त्यामुळे लिखाण कठीण होऊन बसते. लेखक संशोधन प्रकाशात आणतात. त्यामुळे विज्ञानाशी संबंधित लिहिणारे लेखक गरजेचे असल्याचे मत डॉ. मिलिंद वाटवे यांनी व्यक्‍त केले. 

नागपूर : विज्ञानाचे लिखाण करणाऱ्या लेखकांची मराठीत कमतरता आहे. जे आहेत ते सोपी भाषेत लिहीत नाहीत. अनेकांना तर शब्दरचनेत शब्दांचा उपयोग कुठे व कसा करावा याचेच ज्ञान नाही. त्यामुळे लिखाण कठीण होऊन बसते. लेखक संशोधन प्रकाशात आणतात. त्यामुळे विज्ञानाशी संबंधित लिहिणारे लेखक गरजेचे असल्याचे मत डॉ. मिलिंद वाटवे यांनी व्यक्‍त केले. 
प्रसिद्ध लेखक नंदा खरे अनुवादित "इंडिका' ग्रंथाचे लोकार्पण बुधवारी प्रसिद्ध जैवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांच्या हस्ते झाले. "इंडिका' ग्रंथ सुप्रसिद्ध जीवरसायनतज्ज्ञ प्रणय लाल यांचा असून, नंदा खरे यांनी तो मराठीत अनुवादित केला. कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, सकाळ भेटी लागी जीवा आणि मधुश्री पब्लिकेशनतर्फे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. नागपूर विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. कीर्तिकुमार रणदिवे व दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
आपण अनुभवलेल्या अनेक गोष्टींवर लिखाणच झालेले नसते. मुळात एखाद्या गोष्टीवर स्वातंत्र्य लिखाण होऊ शकते, असा विचार करणारे लेखकच आपल्याकडे नाहीत. ते असावे असे मत डॉ. वाटवे यांनी व्यक्‍त केले. डॉ. कीर्तिकुमार रणदिवे म्हणाले, संशोधन करताना आपण घेत असलेला आनंद यशाची पहिली पायरी असतो. हा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा गावातील जलजन्य खडकांचे संशोधन करताना व वरोरा येथील डोंगरगावात "फ्लोराईड'च्या दगडांचे संशोधन करताना आला. या यशात नंदा खरे यांच्यासारखे मार्गदर्शक मिळाले, हे भाग्य असल्याचे रणदिवे म्हणाले. तर इंग्रजी शोधग्रंथांचे भाषांतरण करणाऱ्यांचे प्रमाण घटले असल्याचे मत डॉ. गिरीश गांधी यांनी व्यक्‍त केले. आगामी काळात नंदा खरे विवेकवादी लोकांमध्ये अग्रक्रमाने गणले जातील, असेही गांधी यांनी सांगितले. संचालन सजल कुळकर्णी यांनी केले. 
भूगर्भ, जैवशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्‍त ग्रंथ : नंदा खरे 
प्रणय लाल यांनी सार्वजनिक आरोग्य, जागतिक व्यापार, पर्यावरणशास्त्र, गूढ आजार या विषयांवर विस्तृत लेखन केले. उत्क्रांतीपूर्वीचा भारत प्रणय लाल यांनी "इंडिका' ग्रंथात शब्दांकित केला. हा मराठीतील अनुवाद भूगर्भशास्त्र आणि जैवशास्त्राशी क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्‍त असल्याचे मत ग्रंथाचे लेखक नंदा खरे यांनी व्यक्‍त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Milind Wateway says, "I want to be a science writer."