डॉ. मोहन भागवत म्हणाले,  राष्ट्रीय मुद्दे किती महत्त्वाचे आहे हे दोन दिवसांत स्पष्ट होईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी सात वाजता महाल येथील संघ मुख्यालयाजवळील भाऊजी दफ्तरी शाळेत मतदानाचा हक्‍क बजावला. शंभर टक्‍के मतदान करीत योग्य उमेदवाराची निवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय मुद्दे किती महत्त्वाचे आहे हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. सावरकरांच्या विषयावरून संघाला लक्ष्य केले जात असल्याचा प्रश्‍नावर ते म्हणाले, 90 वर्षांपासून लक्ष्य केले जात आहे. मात्र, चिंता नाही. सर्व राजकारण आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Mohan Bhagwat said, It will be clear in two days how important national issues are