लालित्य असण्याने आत्मचरित्र लालित्यबंध होत नाही

नागपूर : "प्रवास तिच्या जीवनाचा' उपक्रमात सहभागी डॉ. जुल्फी शेख, डॉ. अरुंधती वैद्य, डॉ. विजया राऊत व डॉ. एन. आर. दीक्षित.
नागपूर : "प्रवास तिच्या जीवनाचा' उपक्रमात सहभागी डॉ. जुल्फी शेख, डॉ. अरुंधती वैद्य, डॉ. विजया राऊत व डॉ. एन. आर. दीक्षित.

नागपूर  : आत्मचरित्रातून लालित्य मांडले जाते. लालित्य असणे म्हणजे ते आत्मचरित्र लालित्यबंध होत नाही, असे मत व्यक्त करीत आत्मचरित्रातून महिलांच्या दुःखाची व्यथा परखडपणे माडंली जाते, असे मत डॉ. जुल्फी शेख यांनी व्यक्त केले.नंदनवन येथील विमेन्स कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स आणि विदर्भ साहित्य संघाचे ग्रंथ सहवासच्या वतीने शनिवारी "प्रवास तिच्या जीवनाचा' हा उपक्रम सुरू करण्यात आला. स्त्रियांच्या आत्मचरित्रावर आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थिनींना खूपच भावला. आत्मचरित्र हा एक ललित गद्य प्रकार या विषयावर पहिले पुष्प गुंफण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. आर. दीक्षित होते. डॉ. विजया राऊत, डॉ. अरुंधती वैद्य यांनी विचार व्यक्त केले.स्त्रियांच्या पाऊलखुणांचा दस्तऐवज म्हणजे आत्मचरित्र होय. रमाबाई रानडे यांच्यापासून तर आजपर्यंतच्या परिस्थितीत अनेक बदल झाल्यामुळे आत्मचरित्राच्या रूपबंधातही अनेक बदल झाले. स्त्रियांचे भावविश्‍व, त्यांचा आंतरिक संघर्ष यातही बदल झाले. ही आत्मचरित्रे तुमच्या वागण्याचे होणारे चांगले-वाईट परिणाम समजून घेण्याचे भान आणून देतात. यामुळे आत्मचरित्र या रूपबंधाचा प्रवास उलगडला जावा तसेच नवीन पिढीने आत्मचरित्रांचे वाचन करणे गरजेचे आहे, अशी भावना विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालय संचालक डॉ. अरुंधती वैद्य यांनी व्यक्त केली.डॉ. विजया राऊत यांनी उदाहरणे देत आत्मचरित्राची व्याख्या सांगितली. डॉ. एन. आर. दीक्षित यांनी स्वकर्तृत्ववान बनण्यासाठी आत्मचरित्रे वाचण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन प्रा. संजय सिंगनजुडे यांनी केले. मोहिनी चौदंते यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com