डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना पेन्शन द्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांची पेन्शन निश्‍चित करावी आणि ही प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांची पेन्शन निश्‍चित करावी आणि ही प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.
डॉ. मेश्राम यांच्या वेतन निश्‍चितीची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशावरून डॉ. मेश्राम यांना पेन्शन देण्यास स्थगिती आणली होती. डॉ. मेश्राम यांच्यातर्फे ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिका दाखल करीत पेन्शन सुरू करण्याची विनंती न्यायालयात केली होती. यावर सुनावणी करताना उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना त्यांची पेन्शन ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. 1994 साली कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांची नागपूर विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांची वेतनश्रेणी 4 मे 1991 च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या वेतनश्रेणीनुसार ठरवली होती. त्यानंतर 7 जानेवारी 2000 रोजी अधिव्याख्याता आणि 30 मे 2009 रोजी प्राध्यापकाच्या वेतनश्रेणीत त्यांना ठेवण्यात आले. पुढे कुलसचिव म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, सहसंचालकांतर्फे ठरविण्यात आलेल्या वेतनावर असमाधान व्यक्त करीत त्यांनी उच्च न्यायालयाची पायरी चढली. न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हे आदेश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Pune Chandra Mashram to get pension in two weeks'