डॉ. राजीव पोतदार यांची उमेदवारी निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कळमेश्वर,   ः सावनेरमध्ये बलाढ्य समाजल्या जाणारे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी परिवर्तनासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन जनतेला केला. त्यामुळे पोतदार यांची उमेदवारी पक्की झाल्याचे मानल्या जात आहे.विशेष म्हणजे मागील निवडणुकीत जिल्ह्यातून सुनील केदार हेच एकमेव कॉंग्रेसचे उमेदवार विजय झाले होते. त्यामुळे भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यामुळे त्यांची लढत स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारासोबत झाली होती.

कळमेश्वर,   ः सावनेरमध्ये बलाढ्य समाजल्या जाणारे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी परिवर्तनासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन जनतेला केला. त्यामुळे पोतदार यांची उमेदवारी पक्की झाल्याचे मानल्या जात आहे.विशेष म्हणजे मागील निवडणुकीत जिल्ह्यातून सुनील केदार हेच एकमेव कॉंग्रेसचे उमेदवार विजय झाले होते. त्यामुळे भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यामुळे त्यांची लढत स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारासोबत झाली होती. भाजपने सुरुवातीला सेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर तो काढून घेतला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पोतदार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला होता. मात्र, त्यांची समजूत काढून राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. विजयी झाल्यानंतर केदारांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचेही बोलल्या जात होते. यासाठी विविध तर्कही लावल्या जात होते. भाजपचे उमेदवार मुसळे यांचा अर्ज पक्षाने वकिलांमार्फतच भरून घेण्यात आला होता. सरकारी कंत्राटदार असल्याचे सांगून आयोगाने त्यांचा अर्ज बाद केला होता. असाच आक्षेप रामटेकमधील भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या अर्जावर घेण्यात आला होता. मात्र, त्यांचा अर्ज वैध ठरविला. त्यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेचे उमेदवार तसेच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशीष जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.गेल्या काही दिवसांपासून पोतदार यांना सावनेरमधून उमेदवारी देणार असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद मागून पोतदारांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केल्याचे मानले जाते. कळमेश्वरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा भरपावसातही उभ्या असलेल्या नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. फडणवीस यांचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Rajiv Potdar's candidacy confirmed