डॉ. राऊत यांनी दिला अनुसूचित जाती सेलचा राजीनामा

डॉ. राऊत यांनी दिला अनुसूचित जाती सेलचा राजीनामा

नागपूर : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर देशभरातून कॉंग्रेस पदाधिकारी राजीनामा देत आहेत. यात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांची भर पडली असून, त्यांनी सोमवारी (ता. 1) राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. प्रत्येक राज्यात कॉंग्रेसला अपयश आले. या अपयशात आपलाही वाटा आहे, ही भूमिका घेत डॉ. राऊत यांनी राजीनामा सादर केला. लोकसभा निवडणुकांपूर्वी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. मात्र, यश आले नाही. यामुळेच हा राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी राजीनामापत्रातून कळविल्याची माहिती आहे. त्या वेळी राजकीय कुरघोडी करीत अखिल भारतीय समिती तसेच प्रदेश प्रतिनिधी होण्यापासून डॉ. राऊत यांना रोखले होते. मात्र, माजी मंत्री असलेले डॉ. नितीन राऊत यांची मार्च 2018 मध्ये कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डॉ. राऊत यांची नियुक्ती केल्याची घोषणा जनार्दन द्विवेदी यांनी दिल्लीत केली होती. राऊत यांनी राजीनामा दिला असून, विधानसभा निवडणुकांसाठी परिश्रम घेण्यात येतील, अशी हमी दिली.
कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अव्याहतपणे काम सुरू आहे. पुढेही राहणार आहे. पक्षनेत्या सोनिया गांधी तसेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवीन जबाबदारी दिली होती. ती सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी सदैव उभा आहे. पक्षाला अधिक बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न राहतील.
-डॉ. नितीन राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com