कर्मभूमी दुष्काळ मुक्त करण्यासाठी झटणारे डॉ. रवींद्र सोनटक्के

राजेश सोळंकी
सोमवार, 14 मे 2018

या वर्षी सुद्धा वॉटर कप स्पर्धा घोषित झाली असता त्यात आर्वी तालुक्या सोबत जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश झाला. ही संधी ओळखून डॉ. सोनटक्के कामाला लागले. तालुका समन्वयकांना तालुक्यातील गावा संदर्भात संपूर्ण माहिती दिली आणि प्रशिक्षणार्थी निवडी मध्ये विषेश लक्ष दिले. डॉ. सोनटक्के यांच्या प्रेरणेतून ४० विद्यार्थी पाणी फाऊंडेशन च्या प्रशिक्षणासाठी गेले. डॉ. सोनटक्के सुद्धा प्रशिक्षणासाठी गेले आणि येथुनच खऱ्या लढाईला सुरुवात झाली.

आर्वी (जि. वर्धा) : आर्वीतिल नागरिक आणि कारंजा घाडगे येथील नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज येथे वाणिज्य विभागात प्राध्यापक असलेले डॉ. रवींद्र सोनटक्के हे आपली कर्मभूमी कारंजा तालुक्याला पाणीदार करण्यासाठी झटत आहेत.

डॉ. रवींद्र सोनटक्के तसे वाटर कप २०१७ स्पर्धेत आर्वी तालुक्यातून दुसरा क्रमांक आलेल्या नेरी मिर्झापुर गावातील रहिवासी आहे. मागील वर्षी जन्मभूमी पाणीदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. आपल्या अभिनव शैलीतून गावामध्ये प्रत्येक घरी ग्रामगीता वाटणे, घराला महिलांच्या नावाची पाटी लावणे, घराला पर्यावरण सदृश्य नावे देणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी गावकर्‍यांच्या सहकार्याने राबविली
त्याचीच फलश्रुती म्हणजे २०१७ च्या वॉटर कप स्पर्धेमध्ये नेरी मिर्झापुर आर्वी तालुक्यात दुसरे आले.

या वर्षी सुद्धा वॉटर कप स्पर्धा घोषित झाली असता त्यात आर्वी तालुक्या सोबत जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश झाला. ही संधी ओळखून डॉ. सोनटक्के कामाला लागले. तालुका समन्वयकांना तालुक्यातील गावा संदर्भात संपूर्ण माहिती दिली आणि प्रशिक्षणार्थी निवडी मध्ये विषेश लक्ष दिले. डॉ. सोनटक्के यांच्या प्रेरणेतून ४० विद्यार्थी पाणी फाऊंडेशन च्या प्रशिक्षणासाठी गेले. डॉ. सोनटक्के सुद्धा प्रशिक्षणासाठी गेले आणि येथुनच खऱ्या लढाईला सुरुवात झाली.

डॉ. सोनटक्के हे बी. कॉम ला लेखाकर्म व्यवस्थापन, अंकेक्षण व आयकर सारखे सामाजिक अंगासोबत देणे घेणे नसलेले विषय शिकवतात. मात्र समाजाप्रती असलेल्या जवाबदारीचे भान ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पाण्याविषयी महत्त्व जागृत करण्याचा धडाका लावला. तालुक्यातील २५ गावामध्ये त्यांनी सभा घेतल्या. त्याचा परिणाम गावे जागृत व्हायला लागली. ८ एप्रिलला स्पर्धा सुरू झाल्यानंतर कामातून वेळ काढून महाविद्यालयातील इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा जलदुत दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी तालुक्यातील सर्व गावात पोहचला. दस्तुरखुद्द आमिर खान यांनी रानवाडी या गावामध्ये भेट दिली असता डॉ. सोनटक्के यांच्या कार्याचे कौतुक केले.

कधी सकाळी तर कधी रात्री भुक तहान विसरून फक्त पाण्यासाठी झटणारे काहीच माणसे असतात त्यातले एक नाव म्हणजे डॉ. सोनटक्के. ज्या जन्मभूमीत जन्म घेतला त्या जन्मभूमीचे ऋण फेडणारा व ज्या कर्मभूमीने नाव, रोजीरोटी दिली त्या कर्मभूमीला पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या डॉ. रवींद्र सोनटक्के या जलदुताला लाख लाख सलाम.

Web Title: Dr. Ravindra Sontakke participate in Water cup