डॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द

file photo
file photo


नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले.
डॉ. रोटेले प्राचार्य गटात व्हीजेएनटी प्रवर्गातून निवडून आले होते. 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्यापूर्वीच त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. डॉ. रोटेले भंडारा येथील आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य आहेत. नियमानुसार महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे आहे. विशेष प्रकरणांमध्ये ही मर्यादा 65 वयाच्या वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते. रोटेले यांनी 62 वयाची वर्षे पूर्ण केली असून, वाढीव कालावधीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने अंतरिम संरक्षणही दिले नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी अधिसूचनेद्वारे डॉ. रोटेले यांची मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द करण्याची घोषणा केली.
डॉ. रोटेले यांच्या समर्थकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. अनेक प्राचार्यांना सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून देण्यात आली. काहींनी न्यायालयातून सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवून घेतली. वय वाढवून घेणारे प्राचार्य विद्यापीठातील महत्त्वाच्या प्राधिकरणांवर कायम आहेत. डॉ. रोटेले यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता विद्यापीठाने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. डॉ. रोटले यांनी या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com