वर्धा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी झटणारे डॉ. सचिन पावडे

राजेश सोळंकी
बुधवार, 16 मे 2018

आर्वी (वर्धा) : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील चार तालुक्यात जनचळवळ उभी राहिली आहे. गावांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी गावातील मनुष्यबळा सोबतीला विविध सामाजिक संस्था ह्या पवित्र कामी जोडणारे डॉ. सचिन पावडे हे मागील वर्षी पासुन पाणी फाऊंडेशन सोबत तन, मन आणि धनाने जुडले आहेत. ज्याप्रमाणे, एक भले मोठे झाड स्वतःची सावली, फळे, चारा देत निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे, नैसर्गिक सेवेत असत असच एक झाड वर्धा जिल्ह्याला लाभलं आहे. होय! हे झाड म्हणजे डॉ सचिन पावडे. डॉ सचिन पावडे हे नामांकित बालरोग तज्ञ असुन त्यांना पाणलोटाच्या कामात प्रचंड आवड आहे.

समाजा प्रती आपलं काही तरी देणं आहे अशी समज बाळगणारे डॉक्टर आपल्या व्यस दिनचर्येतून वेळात वेळ काढून समाजासाठी झटत असतात. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने वैद्यकीय जन जागृती मंच या संस्थेची स्थापना केली आहे आणि ही संस्था बरेच सामाजिक उपक्रम राबवत असते.  हा ग्रुप दररोज सकाळी वर्ध्येतील हनुमान टेकडीवर श्रमदानाला जमतो आणि त्या माध्यमातून आजवर या टेकडीवर बरेच पाणलोटाचे उपचार केले गेले आहेत.

मागील वर्षी पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वाटर कप २०१७ च्या स्पर्धेत डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांचा खारीचा वाट होता.  ४१ सामाजिक संघटनांच्या मदतीने बऱ्याच गावांना मदत जन जागृती मंचाने केली. मागच्या वर्षी आर्वी तालुक्याच्या बऱ्याच गावांना श्रमदानाने मदत केली.

या वर्षीच्या वाटर कप स्पर्धेत ११० सामाजिक संघटनांना एकत्र करून पाणी फाउंडेशन च्या चळवळीला मोठा हात भार लावला आहे. डॉ. पावडे आणि त्यांचे सहकारी वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये श्रमदानाला स्वखर्चाने जात आहेत. अश्या या दुष्काळ मुक्त वर्धा जिल्ह्याचे स्वप्न उराशी बाळगून पाणी चळवळीत सक्रियतेने जुडलेल्या अवलियाला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा मानाचा सलाम. 

Web Title: dr sachin ghorpade hardwork for drought free wardha district