पुरावाधारित परिचर्या व आरोग्यसेवा महत्त्वाची : डॉ. मिश्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वर्धा : केवळ परिचर्येपुरतेच नव्हे तर एकूणच वैद्यकीय क्षेत्रात शास्त्रीय पुरावाधिष्ठित शुश्रूषा आणि आरोग्यसेवेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. या क्षेत्रातील प्रत्येकाच्या दैनंदिन कार्याचा तो अविभाज्य भाग असला पाहिजे, असे प्रतिपादन कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.सावंगी येथील श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालयाद्वारे सोमवारी (ता. 17) दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा : केवळ परिचर्येपुरतेच नव्हे तर एकूणच वैद्यकीय क्षेत्रात शास्त्रीय पुरावाधिष्ठित शुश्रूषा आणि आरोग्यसेवेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. या क्षेत्रातील प्रत्येकाच्या दैनंदिन कार्याचा तो अविभाज्य भाग असला पाहिजे, असे प्रतिपादन कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.सावंगी येथील श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालयाद्वारे सोमवारी (ता. 17) दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आज, मंगळवारी या परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.या वेळी नर्सिंग रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष डॉ. उषा उकंडे (इंदोर), डॉ. बी.टी. बसवंथप्पा (बंगलोर), कमलनयन बजाज नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. व्ही. मनोन्मणी (औरंगाबाद), इंडियन नेव्हल हॉस्पिटल ऍण्ड अश्‍विनी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य वंदना अग्निहोत्री (मुंबई), प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, प्राचार्य डॉ. सीमा सिंग, प्राचार्य इंदू अलवाडकर, अधिष्ठाता प्रा. वैशाली ताकसांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेनिमित्त प्रकाशित विशेषांकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी, सोमवारी विविध सत्रांमध्ये प्रो.व्ही. मनोन्मणी, डॉ. बी. टी. बसवंथपा, डॉ. उषा उकंडे, प्रा. वंदना अग्निहोत्री आदी तज्ज्ञांनी "शास्त्रीय पुरावाधिष्ठित परिचर्येद्वारे गुणवत्तापूर्ण शुश्रूषा' विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या चर्चासत्रात परिचर्या संचालक टेस्सी सबास्टीयन, डॉ. अरविंद भाके, प्रो. अन्सी येवला, प्रा. नीता वालोकार (सेवाग्राम), प्रा. लता सुकारे (नागपूर) यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला. परिषदेत शास्त्रीय निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. दोनदिवसीय परिषदेतील विविध सत्राचे संचालन जया गवई, रंजना शर्मा, पूजा कस्तुरकर, खुशबू मेश्राम यांनी केले. आयोजन समितीच्या सचिव डॉ. वैशाली तेंडोलकर यांनी आभार मानले. परिषदेत विविध राज्यांतील सुमारे 145 प्रतिनिधी तसेच परिचर्या शाखेतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: dr vedprakash mishra news