डॉ. विकास महात्मे म्हणाले, मिळालेल्या लाभांवर समाधानी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नागपूर : आरक्षणानंतर एसटीप्रमाणे लागू होणाऱ्या सवलती व लाभ धनगर समाजाला मिळू लागले आहे. भाजप सरकारने धनगर समाजासाठी घेतलेल्या निर्णयांवर समाधानी असल्याची भावना धनगर समाजाचे नेते, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भाजप सरकारने धनगर समाजासाठी नोव्हेंबर 2014 ते सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेल्या निर्णयांचा पाढाच त्यांनी वाचला. 

आरक्षणाचा विषय न्यायालयीन कक्षेत असेपर्यंत एसटी प्रमाणे शैक्षणिक व आर्थिक सवलती लागू केल्या आहेत. न्यायालयीन लढा सक्षक्त व्हावा व जलदगतीने चालावा यासाठी सरकार पाठपुरावा करीत आहे. केवळ धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. अहल्यादेवींची जयंती साजरी होऊ लागली आहे. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव दिले आहे. राज्यभर 61 सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी 40 कोटींचा निधी, मेंढपाळ बांधवांसाठी अधिक चराई क्षेत्र, मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात दरमहा सहा हजार प्रमाणे चार महिन्यांत 24 हजारांचे सानुग्रह अनुदान योजना, भूमिहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी, अर्धबंदिस्त व बंदिस्त मेंढीपालनासाठी जागा खरेदी करण्यासाठी 75 टक्के अनुदान तत्त्वावर अर्थसाहाय्य, बेघर कुटुंबांना 10 हजार घरकुल, वसतिगृहापासून वंचित बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान, 12 वीपर्यंत नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत व प्रशिक्षण, 75 टक्के अनुदानावर शंभर कोंबड्या खरेदी व संगोपनसारख्या योजना सुरू केल्या आहेत, असेही डॉ. महात्मे म्हणाले. पत्रकार परिषदेला योगेश बन, तुळशीराम आगरकर, डॉ. विनोद बरडे, महादेव पातोड, विनोद पाटील उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Vikas Mahatme said, satisfied with the benefits