सत्तेचे धनी व्हा - डॉ. मनोहर

नागपूर - सिव्हिल लाइन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून डॉ. यशवंत मनोहर यांचा रविवारी सपत्‍नीक सत्कार करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे; सोबत डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. नितीन राऊत.
नागपूर - सिव्हिल लाइन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून डॉ. यशवंत मनोहर यांचा रविवारी सपत्‍नीक सत्कार करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे; सोबत डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. नितीन राऊत.

नागपूर - धर्माच्या अस्तित्वाच्या भिंती तोडा आणि सत्तेचे धनी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी आज येथे केले. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात अमृतमहोत्सवी सत्काराला उत्तर देताना डॉ. मनोहर बोलत होते. 

डॉ. मनोहर यांचा सत्कार सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते. विचारपीठावर माजी खासदार तसेच विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्यासह डॉ. पुष्पा यशवंत मनोहर, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. गिरीश गांधी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रकाश खरात उपस्थित होते.

डॉ. मनोहर म्हणाले, या देशात बाबासाहेबांवर नियती लादली गेली. त्या नियतीचा पराभव बाबासाहेबांनी केला. धर्म, संस्कृती दैववादाचा पराभव फुले-आंबेडकर यांनी केला. यामुळेच स्वतःला भाजून घेण्याची, रक्त शरीर शिणवण्याची शक्ती मिळत गेली आणि भाषेवर प्रभुत्व मिळवता आले.
संचालन. डॉ कोमल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. नितीन राऊत यांनी केले. परिचय डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केला. मानपत्राचे वाचन डॉ. प्रकाश राठोड यांनी केले.

देव म्हटले की, यशवंतरावांना राग येणार - शिंदे 
डॉ. यशवंत मनोहरांना उदंड आयुष्य लाभो, असे म्हणताना देवाचा दाखला देता येणार नाही. डॉ. मनोहरांना देव म्हटला की राग येणार, हे निश्‍चित. यामुळे राज्यघटनेचा दाखला देत त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. डॉ. आंबेडकरांचा विचार सर्वस्तरातील दलितांसाठीचा होता. यामुळे बाबासाहेबांचे विचार बौद्धांपुरते मर्यादित ठेवू नका. परिवर्तनाची ही चळवळ चांभार, भंगी, ढोर अशा सर्वस्तरातील समाजापर्यंत पोहोचवण्याची आजच्या परिस्थितीची गरज बनली आहे. यशवंतरावांची लेखणी समाजाला शिकवण देणारी असल्याचे सांगत एकीकडे धर्मनिरपेक्षतेची लढाई लढल्या जात असताना, दुसरीकडे त्याच विचारांची बंदुकीने हत्या केली जाते. परिवर्तनाचे विचारच दडपले जात आहे. तर दुसरीकडे बाबासाहेबांच्या नावाचा उदोउदो केला जातो. मनोहर सरांसारख्या विचारवंतांच्या साहित्याचे विश्‍लेषण होत नाही. त्यांच्या पुस्तकांचा दर्जा मर्यादित ठेवण्याचे कारस्थान प्रस्थापितांकडून आजही होत आहे. 

सोहळा रंगला पुस्तक प्रकाशनांनी 
डॉ. अक्रमण पठाण व डॉ. प्रकाश राठोड यांनी संपादित केलेल्या डॉ. यशवंत मनोहर गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय डॉ. मनोहरांनी लिहिलेल्या क्रांतिकारी रचना, पुनर्रचनेचे पडघम, हस्तक्षेपाचे स्वातंत्र्य व सौंदर्य आणि तुरुंग तोडणाऱ्या उठावाच्या कविता या पुस्तकांचे प्रकाशनांनी हा सोहळा रंगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com