मंदार येथे कुऱ्हाडीने केले अजगराला ठार

file photo
file photo

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील मंदार येथे मानव- वन्यजीव संघर्षात कारण नसताना केवळ भीतीतून एका अजगराचा कुऱ्हाडीने बळी घेतला गेला. मंदार येथील एका शेतात काही युवकांनी अजगराला बघितले. अजगर आपल्याला नुकसान पोहोचवेल या भीतीतून त्यांनी लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने त्याला ठार केले. एवढेच नाही, तर त्यांनी अजगराला मारहाण करतानाचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केला.
परंतु, अजगर बिनविषारी साप आहे. भारतात त्याने माणसाला काही नुकसान पोहोचविल्याचेही फारसे ऐकिवात नाही. वाघ, काळवीट असो की अन्य वन्यजीवांना ठार करणे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा अनुसूची एकमध्ये मोडतो. शिवाय वन्यप्राणी संरक्षण कायदा 1969 प्रमाणे यात सात वर्षांची शिक्षाही होऊ शकते. शिवाय हा गुन्हा अजामीनपात्र आहे. वन्यप्राण्यांना नुकसान पोहोचविणे कायद्याने गुन्हा असून, यासंदर्भात वनविभागाला तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे अजगराला ठार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोषींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी एमएच 29 हेल्पिंग हॅण्डस वाइल्ड ऍडव्हेंचर व नेचर क्‍लब यवतमाळचे सदस्य सुरेश देशभ्रतार, नीलेश मेश्राम, सूरज खोब्रागडे, हरीश कापसे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com