"ड्रॅगन पॅलेस'ला 90 लाख उपसकांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नागपूर - ड्रॅगन पॅलेस टेंपल अल्पावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीस आले आहे. रोज भेट देणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्वधर्मीयांचे आदराचे स्थळ बनले आहे. बौद्ध धम्माचा प्रसार जगभर पसरत असून ही वास्तू लोकार्पित असल्याने प्रत्येकाला आपुलकी आहे. आतापर्यंत 90 लाख उपासकांनी येथे भेट दिली, ही अभिमानाची बाब आहे. सोमवार 14 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर 17 वा वर्धापन दिन साजरा होत आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या संस्थापक ऍड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जपान येथील प्रमुख भिक्षू संघाच्या उपस्थितीत सकाळी अकराला विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना होणार आहे. अध्यक्षस्थानी भदन्त कानसेन मोचिदा असतील. भदन्त ईशीन तोमिनागा, गिक्‍यो वातानाबे, झिकेई मस्तुमोटो, गिकान सुझुकी, होशो सईतो, गोन्शी वातानाबे, न्यून अरिका उत्सुनोमिया, ईशो माचिडा, गोत्सू वोसाकाडा, शिंगो ईमाई, ईरी ओकाझाकी, झेंझो निबे, क्‍योशो फुजाई, यूताई ताझावा, शोडाई अँडो, छिडो उचियामा, ओई फुजाई, अयानो काटो, मासव नगाटा यांच्यासह इतर भन्तेगण उपस्थित राहणार आहेत. 

1999 मध्ये केवळ 28 महिन्यांत ही वास्तू उभी झाली. देशभरातील 90 लाख उपासकांनी विविध देशांच्या प्रतिनिधींनी भेटी देऊन शांती मैत्रीचा संदेश देण्याचे प्रतीक असल्याची प्रशंसा केली आहे. पत्रकार परिषदेला वंदना भगत, नंदा गोडघाटे, भीमराव फुसे, सुशील तायडे उपस्थित होते. 

214 कोटींचा विकासाचा प्रकल्प 
बुद्धिस्ट सर्किटमध्ये ड्रॅगन पॅलेसचा समावेश झाला आहे. यामुळे जागतिक पातळीवर विकासाचा अजेंडा राबवण्यात येणार आहे. केंद्रशासनाकडे 214 कोटींचा विकासाचा प्रकल्प सादर केला. तत्त्वतः मंजूर झाला आहे. परंतु, अद्याप निधी मिळाला नाही. या प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिस्ट रिसर्च सेंटर तयार करण्यात येणार आहे. जगभरातील बुद्धिस्ट राष्ट्रांच्या कला, शिक्षण व संस्कृतीचे आदान प्रदान करणारे केंद्र असणार आहे, असे ऍड. कुंभारे म्हणाल्या. 

Web Title: dragon palace nagpur