तुंबलेले चेंबर वाढविणार डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नागपूर - वाढलेल्या लोकसंख्येमुळे अतिरिक्त ताण पडून शहरातील सिवेज लाईन व चेंबर तुंबणे नित्याचेच झाले आहे. सद्यस्थितीत शहरात १३ हजारांवर चेंबर तुंबले असून पावसाळ्यापूर्वी आढावा बैठकांमध्ये याबाबत साधा उल्लेखही केला जात नाही. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात तुंबलेल्या चेंबरमुळे सांडपाणी घरांमध्येच जमा होण्याची शक्‍यता बळावली आहे. परिणामी नागपूरकरांना यंदाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 

गेल्या दशकात शहराच्या लोकसंख्येत १२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून ३० लाख नागरिकांच्या मल, सांडपाण्याचा ताण जुन्या जीर्ण सिवेज लाईनवर पडत आहे. या सिवेज लाइनवरील जवळवास २६ हजार चेंबर असून, ताण वाढल्याने यातील निम्मे चेंबर कायम चोक असल्याची कबुली स्वतः महापालिकेने २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘सिटी सॅनिटेशन प्लान’मध्ये दिली आहे. गेल्या सात वर्षात तुंबलेल्या चेंबरबाबत प्रशासनाकडून कुठलाही पुढाकार घेण्यात आला नाही. त्यामुळे सिवेज लाईनवरील चेंबर तुंबत असून पावसाळ्यात यापेक्षाही भयानक स्थिती निर्माण होत असते. 

दरवर्षी घरांतील सांडपाणी घरातच तुंबत असल्याने नागरिक ओरडतात. परंतु महापालिकेने याबाबत बहिरेपणाचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी तयारीच्या झालेल्या दोन बैठकांमध्ये चेंबरवर कुठलीही चर्चा न झाल्याने महापालिकेच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यावरच महापालिका भर देत आहे.

1300 कोटींचा आराखडा पडून  
नव्या सिवेज लाइनचा १३०० कोटींचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नवीन सिवेज लाइन खर्चाची बाब आहे. जुन्या सिवेज लाइनवर तात्पुरते चेंबर तयार करून दुरुस्ती करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

चेंबर 26 हजार
चोक चेंबर 13 हजारांवर
सिवेज लाइन 1670 कि. मी.
वाढविण्याची गरज 1200 किमी

Web Title: dranage chamber issue