राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. आशाताई मिरगे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

राज्य महिला आयोगाच्या सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर काम करून डॉ. मिरगे यांनी आपल्या कार्यकौशल्याचा परिचय करून दिला आहे. अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यात त्या सक्रीय आहेत.

अकोला : राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आशाताई मिरगे यांची पक्षाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर काम करून डॉ. मिरगे यांनी आपल्या कार्यकौशल्याचा परिचय करून दिला आहे. अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यात त्या सक्रीय आहेत. त्यांच्या कार्याचे कौतूक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यासोबतच त्या राष्ट्रवादी कॉँग्रेस नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार विद्याताई चव्हाण व राष्ट्रीय महिला अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान यांच्याशी नेहमीच संपर्कात असून त्यांच्या मार्गदर्शनात कार्य'करीत असतात.

पक्षाने त्यांच्यावर दिलेली ही जबाबदारी पक्षाच्या संघटनासाठी महत्वाची असल्याची प्रतिक्रीया पक्षाचे माजी सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, महिला आघाडी महानगराध्यक्ष रिजवाना शेख अजिज, विद्यार्थी नेते शैलेश बोदडे यांनी व्यक्त केली.

Web Title: Dr.Asha Mirge appointed of member on NCP national committee