बिग बी म्हणाले, ‘साची के साथ मेरा फोटो लो’

साची अरमरकरच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना अमिताभ बच्चन.
साची अरमरकरच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना अमिताभ बच्चन.

नागपूर - अभियनाचा शहनशहा असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यावर ७० व्यंग्यचित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन शाळेत लावले होते. त्या प्रदर्शनात अवघ्या ११ वर्षांची चिमुकली साची सुनील अरमरकर व्यंग्यचित्रकार होती. साऱ्यांप्रमाणेच तिनेही आपल्या जादुई बोटातून साकारलेले व्यंग्यचित्र दिले. मात्र, मोबाईलवरून अमिताभच्या ब्लॅक ॲण्ड व्हाइट चित्र रंगीत होत असलेला अतिशय वेगळा परफॉर्मस सादर करताच दोन्ही हातांनी टाळी वाजवत साचीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

एवढ्यावरच बिग बी थांबले नाहीत, तर साऱ्यांच्या समोर ‘साची के साथ मेरा फोटो लो...’ अशी सूचना फोटोग्राफरला केली. साऱ्यांच्या टाळ्यात बिग बीकडून झालेल्या या कौतुक सोहळ्याचा आनंद लुटला. ‘बच्ची टॉप की कलाकार हैं,’ असे बिग बी म्हणाले. 

चिमुकल्या वयापासून चित्रकार म्हणून नावारूपाला आलेल्या साचीच्या अफाट मेहनतीचे आज चीज झाले. चित्रप्रदर्शनात अमिताभ बच्चन आल्यानंतर साऱ्या चित्रकारांचे चित्र बघितले. साऱ्यांचे कौतुक करीत असताना ‘ये बच्ची चित्रकार हैं?’ असे विचारताच बिग बी हसले, तिने काढलेली व्यंग्यचित्रे बघितली. बिग बी आश्‍चर्यचकित झाले. यानंतर मोबाईलवर काढलेले अमिताभ बच्चन यांचे ब्लॅक ॲण्ड व्हाइट असलेले व्यंग्यचित्र हळूहळू कलरफुल होत गेले, हे चित्र बघून त्यांनी साचीला ‘सारे जहाँ की, सबसे छोटी व्यंग्यचित्रकार’ म्हणून घोषित केले. नव्हे, तर तिच्यासोबत फोटो काढण्याची सूचना करीत साचीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. हे दृश्‍य बघून सारेच अवाक झाले. या प्रदर्शनात टाटा पारशी शाळेत शिकणारी चिमुकली भाव खाऊन गेली. 

सर्व व्यंग्यचित्र बिग बी यांना दिले. ‘ये सब मेरे लिए’ असे म्हणत त्यांनी ती सर्व चित्रं स्वीकारली.  सर्वसामान्य कुटुंबातील साची. वडील मिळेत ते काम करतात. तीन वर्षांची असताना तिने रंग उधळायला सुरवात केली. ही सर्व माहिती बिग बी यांनी जाणून घेतल्यानंतर ‘साची के ‘टॅलेंट’ को समजो,’ अशी सूचना केली. साचीच्या चित्रांचे कौतुक करीत गरुड भरारी घेण्यास शुभेच्छा दिल्या. साचीला ॲटोग्राफ दिला. तेव्हापासून या चिमुकलीच्या चेहऱ्यावरचे तेज अधिकच खुलून गेले आहे.

मुलांशी साधला संवाद 
बिग बी म्हणाले, आम्ही येथे ‘झुंड’ची शुटिंग करीत आहोत. मात्र, सेंट जॉन या शाळेतील शिस्तीचा अनुभव मला आला. आम्हाला कोणताही त्रास नाही. तुम्ही शिकत असलेल्या शाळेने दिलेली शिस्त पाळा, असा सल्ला देत शाळेतील शिक्षकांना धन्यवाद दिला. तुमचे बालपण बघून मला माझे बालपण आठवले. शाळेचे दिवस मौल्यवान असतात. ते कधीच विसरू शकत नाही. जे शाळेत शिकाल तेच आयुष्यभर शिदोरीप्रमाणे कामी येते. मी शाळेने दिलेली शिकवण आजही अमलात आणतो. शिक्षकांचा आदर करा. शिक्षकांचा आणि शहराचा आदर करा, भारत देशाचे नाव उज्ज्वल करावे, असेही बिग बी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com