डीआरआयच्या चमूला आसाममध्ये घेराव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर ः नागपूर येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) चमूने आसाम राज्यातील गोलाघातमधील आधारसत्र भागात सुपारीची तस्करी करणाऱ्या अब्दुल हन्नन ऊर्फ बबलूच्या घराची तपासणी केली. दरम्यान, आधारसत्र येथील नागरिकांनी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चमूचा घेराव केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कारवाईत हस्तक्षेप केल्याने अब्दुलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाचे सहाय्यक महासंचालक दिलीप शिवाप्पा यांच्यासह दोन अधिकारी अतुलकुमार महाजन आणि अमृत दास यांची चमू आसाममध्ये दाखल झाले. त्यांनी गोलाघाट येथील सुपारी व्यापारी अब्दुल हन्नन ऊर्फ बबलू यांच्या निवासस्थानी छापा मारला. त्याच्या घराची तपासणी केली. या कारवाईला आसाम येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मदत केली. त्याचवेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या चमूला स्थानिकांनी घेराव घालून कारवाईत हस्तक्षेप केला. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने अब्दुलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही सुपारी तस्करी करणाऱ्या अनेकांना नागपुरात महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई केली होती. त्याचा तपास करीत असताना आसाम हे तस्कराचे मुख्य ठिकाण असल्याचे उघड झाल्याने कारवाई करण्यासाठी चमू आसामला रवाना झाली होती. इंडोनेशियातून सुपारीच्या आयातीवर 108 टक्के सीमाशुल्क लागतो. पण, सीमाशुल्क न भरता नागपुरात आणलेल्या सुपारीच्या विक्रीतून व्यापारी बक्कळ नफा कमवितात. त्यामुळे नागपुरातील अनेक व्यापारी सुपारीच्या तस्करीत गुंतले आहेत. जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने इंडोनेशिया आणि म्यानमार या देशातून अत्यंत कमी भागात सुपारी खरेदी करून समुद्रीमार्गे भारतात आणि नागपुरात आणतात. हे करीत असताना सीमाशुल्काची चोरी करतात. पूर्वी डीआरआयने इतवारीतील ट्रान्सपोर्टर आणि व्यापाऱ्यांवरही कारवाई केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DRI team surrounds Assam