तेलंगणात मद्यप्राशन करून धुडगूस घालणे भोवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : राजुरा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विजय गोमलाडू आणि शिपाई सचिन भोयर यांनी तेलंगणा राज्यात मद्य प्राशन करून धुडगूस घातला होता. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. त्यामुळे गोमलाडू यांची हकालपट्टी, तर भोयर यांना निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक गोमलाडू आणि शिपाई सचिन भोयर तेलंगणा राज्यात गेले होते. तेथे त्यांनी मद्य प्राशन केले. परतीच्या प्रवासादरम्यान दोन राज्यांच्या सीमेवरील गोयगाव येथे ट्रकचालकांशी त्यांनी हुज्जत घातली. ट्रकचालकांनी तेलंगणा पोलिसांकडे तक्रार केली. तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा या दोघांचा धुडगूस सुरूच होता. तेथे उपस्थित नागरिकांनी या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. हे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शिपाई सचिन भोयर यांना निलंबित केले, तर पीएसआय गोमलाडू यांच्यावर निर्णय घेण्यासंदर्भात पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसाद यांनी गोमलाडू यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. मद्यधुंद अवस्थेत पिस्तूल हवेत भिरकावणे आणि परप्रांतात महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, हे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drinking alcohol in Telangana is a mistake