ड्रोन कॅमेरामुळे नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा प्रयत्न फसला

Drone
Drone

एटापल्ली (जि. गडचिरोली) - एटापल्ली तालुक्‍यातील वादग्रस्त सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खनन कार्यावर 40 ते 50 नक्षलवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने नक्षलवादी अपयशी झाले.

रोजच्या प्रमाणे सुरजागड पहाडावर पाचशे मजूर, दोनशे ट्रक, पंधरा पोकलेन मशिन व एक हजार पोलिसांचा ताफा असताना सोमवारी (ता. 26) दुपारी बारा वाजताच्या सुमारास 40 ते 50 सशस्त्र गणवेशधारी नक्षलवादी उत्खनन कार्यावर हल्ला करण्यास येत असल्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सतर्कता बाळगून मजूर व वाहने पहाडाच्या खाली सुरक्षित हलविली व नक्षलविरोधी शोधमोहीम राबविण्यात आली. या वेळी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवादी पसार झाले.

डिसेंबर 2016 मध्ये नक्षलवाद्यांनी लोहखनिज उत्खनन कार्यावर केलेल्या हल्ल्यात मजुरांना बेदम मारहाण करून 80 ट्रकसह जेसीबी व पोकलेन मशिन जाळली होती. यात लॉयड्‌स मेटल कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

पोलिसांची सतर्कता
यानंतर शासनाने पहाडी परिसरातील हेडरी गावात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, आलदंडी व एलचिल येथे पोलिस ठाणे, तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाची छावणी उभारून लोहखनिज उत्खनन व वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून कोणतीही अनुचित घटना दोन वर्षांत घडली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com