ओल्या दुष्काळाचे पंचनामे ड्रोन, उपग्रहाने करा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. असे असताना, राज्यात सत्तेची संगीतखुर्ची सुरू असून अशावेळी शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. वेळेत पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यापेक्षा ड्रोन आणि उपग्रहाच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. बुधवारी समितीद्वारे शेतकऱ्यांच्या उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत, सडका माल भेट देणार असल्याचे ते म्हणाले.
राम नेवले म्हणाले, प्रथम अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने विदर्भातील धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, संत्रा आणि अनेक पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पीक चांगले आले असताना, अचानक आलेल्या पावसाने तोंडाचा घास हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, विम्याची रक्कम कशी भरायची, विजेचे बिल कसे भरायचे असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहेत. विदर्भात 80 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ मदत देणे गरजेचे आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेत सत्तेचा खेळ सुरू आहे. वेळेत पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन आणि उपग्रहांच्या माध्यमातून पंचनामे करा, अशी मागणी राम नेवले यांनी केली. यावेळी पावसामुळे शेतात जी पिकाची हानी झाली. ते घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन दुपारी 1 वाजता आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी 11 वाजता आकाशवाणी चौकात शेतकरी एकत्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत, अरुण केदार, विष्णू आष्टीकर, गुलाबराव धांडे, शेखर काकडे, अनिल केसरवाणी, मुकेश मासूरकर, विजय मौंदेकर, अन्नाजी राजेधर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com