गणेशोत्सवात "डीजे'वर "ड्रोन'चा पहारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : शहरात 39 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली असून शहरातील गणपतीचे विसर्जन 13 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक शांतपणे पार पडण्यासाठी पोलिस गणेश मंडळाचे कार्यकर्ते शांतता समितीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक समन्वयाने काम करतील. मिरवणुकीत ढोलताशे व वाजंत्री यांना मुभा आहे. मात्र, डीजे बंदी कायम राहील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी "ड्रोन' कॅमेराचा पहारा राहणार आहे.

संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसदमध्ये गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत जातीय सलोखा उपक्रम पार पडल्यानंतर पुसद तालुक्‍यातील ग्रामीण विभागात 58 गावात "एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drones guard "DJs" at Ganeshotsav