नागपुरात कोट्यवधींचा गर्द व्यापार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - मुख्यमंत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूरची ‘ड्रग्सपूर’ म्हणून ओळख निर्माण होत आहे. महराष्ट्रात मुंबईनंतर ड्रग्स विक्रीसाठी नागपूर ‘सेफ’ आहे. त्यामुळे नागपुरातून वर्षाकाठी कोट्यवधीचा ड्रग्सचा व्यापार होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आजच अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) तब्बल २७ लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त करीत एका महिला तस्करास अटक केली आहे. चित्रा मनोज रहांगडाले (३०, इतवारी रेल्वेस्थानकाजवळ, शाद हॉस्पिटलसमोर) असे ड्रग्स तस्कर महिलेचे नाव आहे. 

मोतीबाग येथील रेल्वे क्वॉर्टर १८९ जवळ एक महिला अंमली पदार्थ घेऊन येणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. काही वेळानंतर चित्रा ही (एमएच ३१ व्हीएस ३५५७) क्रमांकाच्या होंडा एव्हीऐटरने घटनास्थळी आली. 

दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याजवळ ६५९ ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आली. पोलिसांनी चित्राच्या ताब्यातून २७ लाख रूपये किंमतीची ब्राऊन शुगर, दुचाकी, मोबाईल आणि ६१ ग्रॅम पांढऱ्या रंगाची पावडर जप्त केली. पोलिसांनी चित्राला न्यायालयात हजर करून तिची ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेतली.

युवा पिढी नशेच्या आहारी
नागपुरात अनेक ठिकाणी हुक्‍का पार्लर सुरू आहेत. त्याला स्थानिक पोलिसांचा आशिर्वादही आहे. हुक्‍का पार्लरमध्ये युवक आणि युवतींना हुक्‍क्‍यासह ड्रग्स उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे युवा पिढी नशेच्या आहारी गेली आहे. शहरातील अनेक बारमध्येसुद्धा ड्रग्स उपलब्ध होत असल्याने युवा वर्ग बारकडे आकर्षित होत असल्याची चर्चा आहे. 

पाचपावली तस्करांचा अड्‌डा
गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्स तस्करांनी पाचपावलीत अड्‌डा बनविला आहे. पाचपावलीतून संपूर्ण शहरात ड्रग्स पुरविल्या जाते. या प्रकाराकडे स्थानिक पोलिस ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. तसेच ड्रग्स तस्करीत काही राजकीय किनार असलेल्यांचाही समावेश असल्यामुळे पोलिसांनाही कारवाई करण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याची माहिती आहे.

Web Title: Drug Business in nagpur crime