अमली पदार्थाच्या तस्कराला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर/कामठी : मुंबई येथील एका मेफेड्रोन (एमडी) तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातून 1 लाख 59 हजारांची 53 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केली. सुशांत प्रभाकर तांबे (28, देवनार कत्तलखाना, मुंबई) असे या तस्कराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक एमडी तस्कर मुंबई येथून अमली पदार्थ घेऊन नवीन कामठी येथे येत आहे, अशी माहिती पोलिस शिपाई नितीन मिश्रा यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलिसांनी कामठी रेल्वेस्थानक सराय झोपडपट्टी येथे सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सुशांत यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 53 ग्रॅम मेफेड्रोन पावडर मिळून आली. पोलिसांनी मेफेड्रोन आणि मोबाईल असा 1 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नवीन कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून सुशांत तांबे यास अटक करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drug dealer arrested