मादक पदार्थ विक्रेता गजाआड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नागपूर : एमडी या मादक पदार्थाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अफजल ऊर्फ अरबाज ऊर्फ जासीम जहीनखान (32, रा. फ्रेण्ड्‌स कॉलनी) यास अटक केली. सोमवारी सकाळी 4 च्या सुमारास अफजल ऊर्फ अरबाज हा एमडी या मादक पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अखराज अपार्टमेंटसमोर सापळा रचला. घटनेच्या वेळी अफजल हा कारने घटनास्थळी येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. कारची झडती घेतली असता त्यात 30 हजाराची 10 ग्रॅम एमडी मिळून आली. पोलिसांनी कारसह 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अफजलला अटक करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drug seller arrested