सेलिब्रेशनची झिंग पडेल महागात

भगवान वानखेडे 
Friday, 27 December 2019

थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर मद्यपींची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत पंधरा जणांना पोलिसांनी ईंगा दाखविला आहे.

अकोला : थर्टी फर्स्टच्या झिंगाट पार्टीला जाण्याचा बेत आखला असेल तर जरा सावध होण्याची वेळ आली आहे. कारण, झिंगाट पार्टीला जाताना किंवा परत येताना पोलिसांनी तुमची मद्यप्राशन केल्याची तपासणी केल्यास तुम्हाला तीन हजारांचा दंड तर पडेलच यासोबतच दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षाही त्यामध्ये समाविष्ट आहे. तेव्हा तुमच्या एका सेलिब्रेशनची झिंग तीन हजार रुपयांत पडेल, मात्र, तोपर्यंत तुमची झिंगही उतरलेली असेल यात शंका नाही.

Image may contain: one or more people

नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील विविध हॉटेल्स, बार, रेस्टॉंरंटमध्ये जाणाऱ्यांची अधिक असते. होणारी गर्दी पाहता कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रशासनामार्फत आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली असून, 23 डिसेंबरपासून शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांसह इतर पोलिस कर्मचारी मद्यपी वाहनधारकांची तपासणी करीत असून, प्रत्येक वाहनांवर 31 डिसेंबरपर्यंत पोलिसांची नजर असणार आहे. नववर्ष स्वागताच्या पार्शवभूमीवर परिसरातील फार्म हाऊस, हॉटेल व्यावसायिक, ढाबामालक आतापासूनच तयारीला लागले आहेत. या काळात होणारे मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रकार रोखण्यासाठी वाहतूक पोलिसदेखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी परिसरातील हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठी बेकायदा पार्ट्या होऊ नयेत, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर व शहर उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखा व सर्व पोलिस स्टेशनकडून मोहीम राबविण्यात येत आहे

No photo description available.

15 मद्यपींना दाखविला ईंगा
सर्व जिल्ह्यामध्ये शहर वाहतूक शाखेने ब्रिथ अनायलयाझर मशीन देण्यात आल्या आहेत. सदर मशीन वापरण्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. 23 डिसेंबरपासून मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात व शहरात जवळपास 15  वाहन चालकांविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

Image may contain: one or more people

तीन हजारांच्या दंडासह दोन वर्षाचा कारावास
मद्यप्राशन करून झिंगाटपणे वाहने चालवून उपद्रव घालणाऱ्यांवर शहर वाहतून विभागाची नजर असणार आहे. ही मोहीम सर्वच पोलिस ठाण्यांर्तंग तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात दोन वर्ष कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

No photo description available.

उत्पादन विभाग म्हणतो, सकाळी पाचपर्यंत ढोसा
राज्य उत्पादन शुल्क विभागाने थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील देशी- विदेशी मद्यविक्रीच्या दुकांनाच्या वेळेत महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1)(सी) व कलम 143 (2)(एच-1) (4) अन्वये वेळा वाढवून देण्यास मान्यता दिलेली आहे. यामध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत बार उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

शहरात 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालवून उपद्रव घालविणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतून विभागाची नजर असणार आहे. सध्या ही मोहीम सुरू असून, पुढील काही दिवस ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.
-गजानन शेळके, पोलिस निरीक्षक, शहर वाहतून विभाग, अकोला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drunk and drive is going to punishment