स्कूल बसच्या दारुड्या चालकाच्या भरवशावर छकुला सोडणार का? 

अनिल कांबळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नागपूर : सोमवारी दुपारी पाऊण वाजताची वेळ... जगनाडे चौकात वाहनांची नेहमीची वर्दळ... एका स्कूल व्हॅनमध्ये केजी वनमध्ये शिकणारे नऊ चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन चालक सुसाट... स्कूल व्हॅन डगमगत रस्त्यावर धावत होती... चिमुकले जोरात आरडाओरड करीत होते... वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांची नजर स्कूल व्हॅनवर पडली... त्यांनी लगेच धावपळ करीत स्कूलव्हॅनकडे धाव घेतली... मोठ्या प्रयत्नाने स्कूल व्हॅन थांबवली... चालकाजवळ जाताच चव्हाण यांना दारूचा उग्र दर्प आला... त्यांनी चालकाला खाली खेचले आणि मुलांना व्हॅनमधून सुरक्षित बाहेर काढले.

नागपूर : सोमवारी दुपारी पाऊण वाजताची वेळ... जगनाडे चौकात वाहनांची नेहमीची वर्दळ... एका स्कूल व्हॅनमध्ये केजी वनमध्ये शिकणारे नऊ चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन चालक सुसाट... स्कूल व्हॅन डगमगत रस्त्यावर धावत होती... चिमुकले जोरात आरडाओरड करीत होते... वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांची नजर स्कूल व्हॅनवर पडली... त्यांनी लगेच धावपळ करीत स्कूलव्हॅनकडे धाव घेतली... मोठ्या प्रयत्नाने स्कूल व्हॅन थांबवली... चालकाजवळ जाताच चव्हाण यांना दारूचा उग्र दर्प आला... त्यांनी चालकाला खाली खेचले आणि मुलांना व्हॅनमधून सुरक्षित बाहेर काढले. थोडा उशीर झाला असता तर नक्‍कीच नऊ चिमुकल्यांचा जीव धोक्‍यात असता... चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

Image may contain: car and outdoor
पोलिस ठाण्यात जमा केलेली हीच ती स्कूल व्हॅन. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जगनाडे चौकात वाहतूक पालिस निरीक्षक महेश चव्हाण आपल्या पथकासह कर्तव्यावर होते. त्यांना समोरून येणारी एमएच 49 एटी 2238 या क्रमांकाची स्कूल व्हॅन भरधाव येताना दिसली. चालकाचे वाहनावर नियंत्रण नसल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी वाहन थांबविले.

ही बातमी अवश्य वाचा - सावधान..! तुमचा पासवर्ड गाडी, मोबाइलचा नंबर तर नाही ना...

वाहनचालक प्रवीण किसन फुलारे (वय 39, सहकारनगर) याला ताब्यात घेतले. त्याची ब्रिथ ऍनालायझरने तपासणी केली असता तो खूप दारू पिऊन वाहन चालवीत असल्याचे स्पष्ट झाले. त्या स्कूल व्हॅनमध्ये तेजस्विनी कॉन्व्हेंटचे केजी वन आणि केजी टू वर्गाचे नऊ विद्यार्थी होते. पोलिसांनी लगेच वाहन ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात जमा करून चालकावर कारवाई केली. 

Image may contain: 1 person, car and outdoor
 हाच तो मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतलेला चालक. 

खाऊ आणि चॉकलेट

चालकाला ताब्यात घेऊन स्कूल व्हॅन पोलिस ठाण्यात लावली. व्हॅनमधील मुले उपाशीपोटी असल्याचे पीआय चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मुलांसाठी बिस्किटे, चॉकलेट आणि खाऊ बोलावला. सर्व मुलांनी खाऊ खाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था केली. त्या वाहनातून सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या घरापर्यंत सोडून आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. 

कसं काय बुवा? - 'हनी देगा मनी'

साहब... बहोत बहोत धन्यवाद!

विद्यार्थ्यांच्या पालकांना ही घटना कळल्यानंतर सर्वांनीच सक्‍करदरा वाहतूक चेम्बरकडे धाव घेतली. पीआय चव्हाण आणि पोलिस कर्मचारी सुभाष लांडे यांची भेट घेऊन आभार मानले. "साहब... मुझे एकही लडका हैं... आज आप नहीं होते तो बडा अनर्थ होता...बहोत बहोत धन्यवाद' अशा शब्दात पोलिसांचे आभार मानले. 


महेश चव्हाण

सुरक्षिततेची काळजी घ्या 
पालकांनी पाल्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. आज आम्हाला डगमगलेल्या अवस्थेत स्कूल व्हॅन दिसल्यानंतर संशय आला. व्हॅन अडविल्यानंतर धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. शाळा प्रशासन आणि पालकांनी अशा दारुड्या वाहनचालकांच्या स्वाधीन चिमुकल्यांना करू नये. 
- महेश चव्हाण,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सक्‍करदरा वाहतूक शाखा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The drunk driver was taken into custody