दारू पिऊन गाडी चालवताय... सावधान!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

नागपूर : दारू पिऊन वाहन चालवताय... सावधान! आता वाहतूक पोलिस केवळ आर्थिक दंडच नव्हे तर थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया न्यायालयातून करीत आहेत. पहिल्यांदा सापडल्यास दंड आणि सहा महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्यात येत आहे. आतापर्यंत ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी 30 चालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करून एका वाहनचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश शहजाद परवेज यांनी दिले आहेत.

नागपूर शहरात दरवर्षी प्राणांतिक अपघातात निष्पाप लोकांचा बळी जातो. त्यात बहुतांश वाहनचालक हे मद्याच्या अमलाखाली वाहने चालवित असल्याचे लक्षात आले. मद्यपी वाहनचालकांवर जास्तीतजास्त कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे आवश्‍यक होते. या वाहनचालकांना शोधण्यासाठी विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त गुन्हे करणाऱ्यांना शोधणे सुलभ झाले आहे. या वाहनचालकांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे पुराव्यासह न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात येत आहे.
सीताबर्डी वाहतूक शाखेतर्फे नियमितपणे विशेष मोहीम राबवून दारुड्या वाहनचालकांची धरपकड करण्यात आली. त्यावेळी या मद्यपींनी यापूर्वी केलेले गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश शहजाद परवेज यांनी यातील 4 मद्यपी वाहनचालकांना 5 हजारांचा दंड ठोठावून एका वाहनचालकाचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित केला. यानंतरही हा वाहनचालक मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास नेहमीसाठी त्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drunk driving is driving ... Beware!